राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, सूत्रांची माहिती

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, सूत्रांची माहिती

गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी (Corona test) केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे.

  • Share this:

जळगाव, 31 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader Eknath Khadse) एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी (Corona test) केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्याकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. गेल्या महिन्यातही एकनाथ खडसे यांनी कोरोनाची लागण झाली होती.

एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांना सक्तवसुली संचालनालयानं ( ED) नोटीस बजावून 30 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलवलं होत. मात्र, एकनाथ खडसे यांनी कालच EDला विनंती पत्र लिहिलं. कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आल्यानं चौकशीसाठी 14 दिवसांची मुभा मिळावी, असं एकनाथ खडसे यांनी पत्रात म्हटलं होतं.

एकनाथ खडसे यांनी पत्रात म्हटलं आहे की, ED च्या मुंबईतील कार्यालयात उपस्थित होण्यासाठी समन्स प्राप्त झाले आहे. त्यासाठी मी मुंबईलाही पोहोचले आहे. मात्र, 28 डिसेंबरला आपल्याला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणात जाणवला. वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली. आता तोच रिपार्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार एकनाथ खडसे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार 14 दिवस विश्रांती आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. प्रकृती बरी झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयास पूर्ण सहकार्य करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ED चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाली होती आणि याचं भूखंडावरून त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ED नं नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुणे आणि नाशिक येथील अॅन्टिकप्शन ब्युरोकडून पाच वर्षांत चौकशी करण्यात आली होती. तसंच झोटिंग समिती आणि आयकर विभागाने देखील चौकशी केली होती. आता या प्रकरणाची ED चौकशी करणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 31, 2020, 1:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या