बीड, 13 ऑगस्ट : 'माजी मंत्री आणि भाजप (bjp) नेत्या पंकजा मुंडे (dhanjay munde) यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळ्या ( Chikki scam) प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'माझी मागणी कोर्टाने (mumbai high court) लक्षात घेतली आहे. आधीपासून मी सांगत होतो गुन्हा दाखल करा' अशी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.
पंकजा मुंडे यांच्या काळात गाजलेल्या चिक्की घोटाळा प्रकरणाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. आज मुंबई हायकोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी, या प्रकरणात अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? असा सवाल राज्य सरकारला विचारण्यात आला आहे.
टेक कंपनी सोडून या दोन महिला बनवतायत 'एडिबल कटलरी', काय आहे नेमकं वाचा
'माझी मागणी कोर्टाने लक्षात घेतली आहे. आधीपासून मी सांगत होतो गुन्हा दाखल करा. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टात देखील गेले होते. त्यामुळे आता सर्व बाबी कोर्टाच्या हळूहळू लक्षात येत आहे' अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.
डावखुऱ्या व्यक्तींचा मेंदू असतो आपल्यापेक्षा तल्लख?; वाचा तज्ञ काय सांगतात
'चिक्की घोटाळा निघाल्यापासून माझी सातत्याने मागणी आहे की, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे आणि आज नाही 2 वर्षापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एसीबीकडे अर्ज केला आहे. सगळा विषय कोर्टात आहे. त्यामुळे माननीय कोर्ट काय निर्णय घेईल ते पाहू' असं मतही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.
काय आहे प्रकरण?
फडणवीस सरकारच्या काळात 2015 ला चिक्की घोटाळा झाला होता. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातला हा पहिला सर्वात मोठा घोटाळा होता. 24 काँट्रॅक्ट 206 कोटी देण्यात आले होते. सूर्यकांता बचत गटाला 106 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट देत विना टेंडर खरेदी केली होती. कंत्राट दिलेल्या कंपनी बंद अवस्थेत असल्याचं समोर आलं. चिक्की निकृष्ट असल्याचं अहमदनगर जिल्ह्यात तक्रार दाखल झाला. या घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एसीबी चौकशी लावली होती. आश्चर्य म्हणजे, एसीबीने महिला बालकल्याण विभागाला विचारलं घोटाळा झालाय का? अखेर पंकजा मुंडे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. 2015 मध्ये प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झालं. पंकजा मुंडे यांना क्लीन चिट मिळाली असली तरी दोषी अधिकारी यांच्यावर 15 दिवसात गुन्हे दाखल करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं.
पण अजून पर्यंत कुणावर गुन्हे दाखल नाही. आज न्यायालयाने याबाबत विचारणा केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.