लाल दिवा नाही, धनंजय मुंडे म्हणतात...'हे' आहे माझं स्वप्न!

लाल दिवा नाही, धनंजय मुंडे म्हणतात...'हे' आहे माझं स्वप्न!

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससह हालचाली सुरू केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. निवडणुकीपूर्वी दयनीय अवस्थेत असलेल्या राष्ट्रवादीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावातामुळे अच्छे दिन आले आहेत. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससह हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महाआघाडीत कोणत्या नेत्याला कोणतं मंत्रिपद मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. 'लाल दिव्यापेक्षा मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचे माझे स्वप्न आहे. मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्‍याला पीक विमा, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू असल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेसची चर्चा सुरू केली. या जुळवाजुळवीलाही आता अनेक दिवस होत असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न आता सेनेतूनच विचारला जातोय. दररोज फक्त बैठका होत असल्याने त्यातून काहीही निघत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर हाता तोंडाशी आलेला घास जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करणार आहेत.

सर्व आमदारांना शुक्रवारी मातोश्रीवर बोलविण्यात आलं असून या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना वस्तुस्थिती सांगणार आहेत. या बैठकीत ते कुठला संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO: सत्ता स्थापनेवरुन शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ, पाहा काय म्हणाले

Published by: Akshay Shitole
First published: November 19, 2019, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading