Home /News /maharashtra /

धनंजय मुंडेंचं राज ठाकरेंना खुलं आव्हान, म्हणाले....

धनंजय मुंडेंचं राज ठाकरेंना खुलं आव्हान, म्हणाले....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या औरंगाबादच्या (Aurangabad) सभेतील भाषणावरुन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी खुलं आव्हान दिलं आहे.

बीड, 2 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या औरंगाबादच्या (Aurangabad) सभेतील भाषणावरुन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी खुलं आव्हान दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंना समोरासमोर बसून इतिहासाच्या घडामोडींवर चर्चा करण्याचं खुलं आव्हान दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाला राज ठाकरे नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंगे (Mosque loudspeaker) उतरविण्याबाबतच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) तीनही पक्षाच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. "पुरोगामी महाराष्ट्रात जे घडलं नाही ते घडवायचा प्रयत्न सुरु आहे", असं धनंजय मुंडे राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेवर म्हणाले आहेत. धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले? "भोंग्यापेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. भोंगे लावने आणि काढण्याने आजच्या तरुणांना भाकर मिळणार आहे का? दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे काम मनसे करत आहे. भोंग्याच्या प्रश्नाने महाराष्ट्राची आणखी प्रगती होणार असेल तर त्यांची भूमिका योग्य आहे असे समजू. पण पुरोगामी महाराष्ट्रात जे घडलं नाही ते घडवायचा प्रयत्न सुरु आहे. पवार साहेबांनी कधीच जातपात मानली नाही. कोण किती जातीवादी आहेत, एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. एकदा समोरासमोर बसू", असं म्हणत धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (BREAKING : औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरेचं पहिलं ट्विट! म्हणाले, 'उद्या ईद आहे....') मनसेवर कारवाई होणार? दरम्यान, राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नियमांचं उल्लंघन केलं का, त्यांनी लोकांना भडकविण्याबाबतचं वक्तव्य केलं का याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. विशेष म्हणजे औरंगाबादच्या पोलिसांनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबतचा गोपनीय अहवाल वरिष्ठ पोलिसांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी इतिहासाबद्दल केलं 'हे' विधान राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या इतिहासावर भाष्य केलं होतं. त्यावर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "इतिहासाच्या बाबतीत तडजोड करणार नाहीत. पुरंदरचा तह का कुठल्या मुसलमानांबरोबर केलं नाही. मिर्जा राजे जयसिंग यांच्याशी तह केला होता. औरंगजेब याने आपला प्लॅन रचला होता, मदारी मेहत्तर तिथे झोपला आणि शिवाजी महाराज दक्खनला गेले होते. औरंगाबादचं नाव खडकी होतं, हे नाव नकाशावर मलिक अंबर यांनी आणला, त्याचा जन्म इथिओपिया मधला, हे सांगावं लागतं, अंबर हा गुलाम म्हणून भारतात आला आणि खडकीच्या निजामशाहीतून बाहेर पडून राजा बनला", असा दाखला आव्हाडांनी दिला आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Dhananjay munde, Maharashtra politics, MNS, NCP, Raj Thackeray

पुढील बातम्या