Elec-widget

राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना धनंजय मुंडेंची PM मोदींवर घणाघाती टीका

राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना धनंजय मुंडेंची PM मोदींवर घणाघाती टीका

'विरोधकांनी 70 वर्षात देश विकला असं किंकाळणाऱ्यांनी देश विकायला काढला आहे.'

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तास्थापनेचा अभूतपूर्व गोंधळ आता शांत होण्याची शक्यता आहे. शिवसेना,  काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'विरोधकांनी 70 वर्षात देश विकला असं किंकाळणाऱ्यांनी देश विकायला काढला आहे,' अशी घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

केंद्र सरकारकडून देशातील काही मोठ्या कंपन्यांचं खासगीकरण करण्यात येणार आहे. या मुद्द्यांवरूनच धनंजय मुंडे यांना सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 'भारत पेट्रोलियम, शिपिंग कॉर्पोरेशनसह पाच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. विरोधकांनी 70 वर्षात देश विकला असं किंकाळणाऱ्यांनी देश विकायला काढलाय! येणारी पुढची पिढी यांना कदापी माफ करणार नाही,' असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

लाल दिवा नाही,'हे' आहे माझं स्वप्न!

निवडणुकीपूर्वी दयनीय अवस्थेत असलेल्या राष्ट्रवादीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावातामुळे अच्छे दिन आले आहेत. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससह हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महाआघाडीत कोणत्या नेत्याला कोणतं मंत्रिपद मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. 'लाल दिव्यापेक्षा मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचे माझे स्वप्न आहे. मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्‍याला पीक विमा, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Loading...

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...