महाजनादेश नव्हे 'महाधनादेश' यात्रा..धनंजय मुंडेंनी उडवली खिल्ली

महाजनादेश नव्हे 'महाधनादेश' यात्रा..धनंजय मुंडेंनी उडवली खिल्ली

महाराष्ट्रात गेली पाच वर्षे जे राज्यकर्ते आहेत, त्यांनी सर्वात आधी शिवछत्रपतींचा अपमान केला. देशाच्या पंतप्रधानांनी स्मारकाचं भूमीपूजन करूनही त्याची एक खडी ही उभी केली नाही.

  • Share this:

रायचंद शिंदे (प्रतिनिधी)

जुन्नर, 6 ऑगस्ट- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा मंगळवारी किल्ले शिवनेरीवर प्रारंभ झाला. सकाळी 8 वाजता खासदार डॉ.अमोल कोल्हे, धनंजय मुंडे,अतुल बेनके, सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी किल्ले शिवनेरीची गडदेवता शिवाई देवीला अभिषेक केला. त्यानंतर शिवजन्मस्थानास अभिवादन करून शिवकुंज येतील बालशिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादन केले.

खासदार डॉ. कोल्हे आणि धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजप सरकारवर घणाघात केला. शिवसेना आणि भाजपच्या यात्रे कुणी ना कुणी मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे. पण शिवस्वराज्य यात्रा ही छत्रपतींच्या मावळ्यांनी रयतेचा आवाज बुलंद करण्यासासाठी काढली आहे. आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री शिवजन्मोत्सवासाठी किल्ले शिवनेरीवर यायचे आणि किल्ल्याच्या खाली आले की मावळ्यांना भेटायचे. पण मागील पाच वर्षात ते कधी खाली आलेच नाहीत. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा असेल आणि पुन्हा मावळ्यांना भेटायला मुख्यमंत्री खाली येतील, असा आशावाद डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

महाजनादेश नन्हे 'महाधनादेश' यात्रा

भाजपने काढलेली महाजनादेश यात्रा नाही तर 'महाधनादेश' यात्रा आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवली. ज्यांना आज जनतेचा आशीर्वाद घ्यायची गरज वाटते, अशा शब्दांत मुंडे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. धनंजय मुंडे म्हणाले की, या महाराष्ट्रात गेली पाच वर्षे जे राज्यकर्ते आहेत, त्यांनी सर्वात आधी शिवछत्रपतींचा अपमान केला. देशाच्या पंतप्रधानांनी स्मारकाचं भूमीपूजन करूनही त्याची एक खडी ही उभी केली नाही. शिवछत्रपतीच्या नावाने जी कर्जमाफी या सरकारने आणली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यातही शेतक-यांना फसवलं. लाखो बेरोजगार तरुणांची महाभरतीच्या नावाखाली फसवले. मात्र, खरी महाभरती ते त्यांच्या पक्षातली करतायेत. शासकीय पदांची महाभरती ते करत नाहीत, असा टोलाही लगावला. सत्तेची मस्ती भाजप-शिवसेनेला आली आहे. सत्तेची मस्तीच आज राजकीय भ्रष्टाचार करायला या लोकांना लावतेय. असेक प्रलोभन दाखवून, अडचणीत आणून काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केले आहे. या राज्यात राज्यकर्ते म्हणून कुणीही अमृत पिऊन आलेलं नाही. त्यामुळे शिवसेना-भाजपने राजकीय भ्रष्टाचार सुरू केला असेल तरी या निवडणुकीत जनता या लोकांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, या शब्दात मुंडे यांनी सरकारवर तोफ डागली.

VIDEO '...आणि हे मंत्री नाचतायत'; महाजनांच्या जल्लोषावर अजित पवारांची बोचरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 07:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading