Home /News /maharashtra /

भाजपच्या वाटेवर गेलेल्या 'त्या' सगळ्यांची लागली वाट, धनंजय मुंडेंची खोचक टीका

भाजपच्या वाटेवर गेलेल्या 'त्या' सगळ्यांची लागली वाट, धनंजय मुंडेंची खोचक टीका

कोरोना उपचारानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना उपचारानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत अनेकदा बीड जिल्ह्यात भावनेच राजकारण झालं. का झालं कस झालं हा माझ्या दृष्टीने चर्चेचा विषय नाही. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात विकासाचं राजकारण होतं.

बीड,26 जानेवारी: एकदा चक्र फिरलं की सगळं बिघडत जातं.. ज्याला ज्याला वाटत होतं भाजप पुन्हा सत्तेत येणार.. पण घडलं भलतच. सत्तेसाठी भाजपच्या वाटेवर जे जे गेले त्या सगळ्यांची आता वाट लागली असल्याचे वक्तव्य राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात केले. बीड शहरात यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक, कर्मचारी, पुरस्कार वितरण सोहळा 2020 या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. धनंजय मुंडे म्हणाले, आमदार वडकुतेंनी राजीनामा दिला हे निकालाच्या दिवशी समजले. निवडणूक एवढी शिगेला पोहोचली होती. आमदार वडकुतेंनी राजीनामा का दिला? यांची चर्चा त्यांच्या मतदारसंघाला देखील समजली नाही. आपण बघितलं सत्तांतराच्या वेळी काय वातावरण होतं राज्यातल्या घडामोडी..स्पष्टपणाने राज्याचा मंत्री म्हणून काही गोष्टीं बोलता येत नाहीत.आपण सुज्ञ आहात. म्हटलं की पुढचं कळतं. चार-पाच दिवसांत ज्यांनी मतदान केलं त्यांची भावना बदलली. महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदाराची भावना होती एका पक्षा बाजूला ठेवा. चार-पाच एकत्रित या आणि सत्ता स्थापन करा. पण भाजपला बाजूला ठेवा, अशी भावना होती म्हणून तुमच्या भावनेतून निर्माण झालेले हे सरकार आहे. म्हणून तुमच्या भावना हे महाविकास आघाडीचे सरकार कधीही दुखावणार नाही. बीड जिल्हा मागासलेला आहे. तो कलंक कधीच आपल्याला पुसता आला नाही. सत्तेच्या या पाच वर्षांत मागासलेला पणाचा कलंक पुसून काढु, असे आश्वासनं धनंजय मुंडे यांनी दिले. आजपर्यंत अनेकदा बीड जिल्ह्यात भावनेच राजकारण झालं. का झालं कस झालं हा माझ्या दृष्टीने चर्चेचा विषय नाही. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात विकासाचं राजकारण होतं. इथून पुढे बीड जिल्ह्यात विकासाचं राजकारणच होईल, असे सांगत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. सत्तांतरच्या वेळी काय वातावरण होतं. राज्यातल्या घडामोडी..स्पष्टपणाने राज्याचा मंत्री म्हणून काही गोष्टीं बोलता येत नाहीत. आपण सुज्ञ आहात, असे सूचक वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Beed news, BJP, Cong ncp, Dhananjay munde, Latest news, Pankaja Mumde, पंकजा मुंडे beed news

पुढील बातम्या