विधानसभेआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का? धनंजय महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

विधानसभेआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का? धनंजय महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 29 मे : कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक यांनी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या भेटीत महाडिकांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

जयंत पाटलांनाही भीती

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आघाडीतील काही आमदार भाजपमध्ये जातील, अशी भीती आता आघाडीचे नेतेही व्यक्त करत आहेत. 'भाजपला मिळालेल्या यशामुळे काही आमदार असा निर्णय़ घेऊ शकतात. यामध्ये कमी मताधिक्क्याने निवडून आलेले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकतील,' असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. कमीत कमी आमदार जातील याकडे लक्ष ठेवून असल्याचंही जयंत पाटील सांगितलं.

लोकसभेनंतर 2019 च्या शेवटी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपने यासाठीची रणनिती आखण्यास आतापासूनच सुरुवात केल्याचं यावरून दिसतं. भाजपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला खिंडार पाडून अनेक नेत्यांना पक्षात घेतलं होतं. तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीत वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना शह देण्याची शक्यता आहे.

SPECIAL REPORT : दहावीपेक्षा बारावीचे मार्क भरपूर, पाहा आर्चीचं रिपोर्टकार्ड

First published: May 29, 2019, 10:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading