मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रेय भरणे मुख्यमंत्र्यांबद्दल नको ते बोलून बसले, आता व्यक्त केली दिलगिरी, VIDEO

राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रेय भरणे मुख्यमंत्र्यांबद्दल नको ते बोलून बसले, आता व्यक्त केली दिलगिरी, VIDEO

'माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे'

'माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे'

'माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे'

सोलापूर, 15 ऑगस्ट : परभणीमध्ये (shivsena mla bandu jadhav) शिवसेनेच्या आमदाराने राष्ट्रवादीला पायाखाली घेण्याची भाषा केली होती. त्यानंतर आता  सोलापूरचे (solapur) पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणेंची (ncp mla dattatray bharane) जीभ घसरली. चक्क 'मुख्यमंत्री मरू द्या' असं म्हणत दत्तात्रेय भरणे यांनी बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द उद्गागारले. मात्र, त्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. सोलापूर महापालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला  राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे उपस्थितीत होते. यावेळी व्यासपीठावर बोलत असताना निधीचा विषय निघाला. युवासेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच रचला कट? 'मी खूप समाधानी आहे. जे काही आशीर्वाद असतील ते अजितदादांना द्या. गटनेते, नगरसेवकांनी आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे. इथं चांगलं गार्डन उभं करायचं आहे. आपल्याला १ कोटी रुपयांचा निधी द्यायचा आहे. तुमच्याकडून मला प्रस्ताव द्या, तितक्यात महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडून निधी आपल्याला घ्यायचा आहे, असं विधान केलं असता. त्यावर भरणे म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांचे जाऊ द्या, मरू द्या, आपण आपलं करूया ना. मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घ्यायचा आहे' असं वक्तव्य भरणे यांनी भर व्यासपीठावर केल्यामुळे एकच खळबळ उडाली. 'तो कार्यक्रम तिथे घेतला होता. मी कार्यक्रमाला पोहोचले पण महापौरांना येण्यास उशीर झाला. मी बोलत असताना ४३ एकरामध्ये चांगला बगीचा तयार केला जात आहे. महापौरांनी निधीची मागणी केली होती. तातडीने एक कोटींचा निधी दिला जाणार आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, पण काही माध्यमांनी मुद्दामहुन माझ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला. माझ्या विधानामुळे कुणाचे मन दुखावले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत भरणे यांनी भावना व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राष्ट्रवादी आज सत्तेत आहे. ज्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेत बसला  आहात, त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरताय, तुम्ही नीट भाषा वापरा अन्यथा सोलापूरची सीमा ओलांडून देणार नाही, असा इशाराच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी दिला.
First published:

Tags: NCP

पुढील बातम्या