महाराष्ट्रात परत सत्ता येईल असा, भाजपच्या वरिष्ठांकडून आमदारांना 'लॉलीपॉप', भुजबळांचा टोला

महाराष्ट्रात परत सत्ता येईल असा, भाजपच्या वरिष्ठांकडून आमदारांना 'लॉलीपॉप', भुजबळांचा टोला

देवेंद्र फडणवीस (Devendra Fdnavis) यांच्या दिल्ली भेटीमुळे राजकीय चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला आहे.

  • Share this:

नाशिक, 17 जुलै: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्राबाबतची चर्चा या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण समजली जात होती. मात्र, राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न- नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक टीका केली आहे.

हेही वाचा...भाजपमध्ये नारायण राणेंची स्थिती म्हणजे 'ना घर का ना घाट का' अशी, सेनेचा पलटवार

भाजप आमदारांना इकडे तिकडे बघू नये म्हणून वरिष्ठांकडून महाराष्ट्रात सत्ता परत येईल, असा 'लॉलीपॉप' दिला आहे, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे चालणार असल्याचा विश्वासही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

फडणवीसांच्या दिल्ली भेटीवर काय म्हणाले संजय राऊत...

देवेंद्र फडणवीस (Devendra Fdnavis) यांच्या दिल्ली भेटीमुळे राजकीय चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Rut) यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात 'राजकीय प्रादूर्भाव होणार नाही. कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरतोय. राज्यात सर्व आलबेल आहे. सरकारला काहीही धोका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच सरकार पाच वर्षे टिकणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, फडणवीस यांनी आज अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. शनिवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचीही भेट घेणार आहेत. ही भेट कोरोनाची स्थिती आणि शेतीच्या प्रश्नांवर आहे असं सांगितलं जात असलं तरी राज्यातल्या राजकीय स्थितीवर त्यात चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक घेतली. त्या बैठकीनंतर बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांची मते जाणून घेतली.

हेही वाचा...प्रेषित मोहम्मदांच्या सिनेमा बंदीवर प्रकाश आंबेडकर मुख्यंत्र्यांना भेटले

कोकणामध्ये गणपती उत्सवाबाबत काय भूमिका घ्यावी यावरही चर्चा झाली. बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. शिवसेनेचे खासदार एकत्र आले, चर्चेचा मुख्य विषय कोविड उपाययोजना होता.

Published by: Sandip Parolekar
First published: July 17, 2020, 7:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या