मोठी बातमी! छगन भुजबळांचा शिवसेना प्रवेश अखेर निश्चित, मातोश्रीवर बांधणार शिवबंधन

छगन भुजबळ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 01:57 PM IST

मोठी बातमी! छगन भुजबळांचा शिवसेना प्रवेश अखेर निश्चित, मातोश्रीवर बांधणार शिवबंधन

स्वाती लोखंडे-ढोकेमुंबई, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. छगन भुजबळ हे उद्या (1 सप्टेंबर)दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात कार्यकर्त्यांचं मोठं संघटन असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र भुजबळ यांच्याकडून वारंवार या चर्चा फेटाळल्या जात होत्या. मात्र आता भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. छगन भुजबळ हे शिवसेना प्रवेशावेळी आपली ताकद दाखवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर पोहोचणार आहेत.

सुप्रिया सुळेंच्या यात्रेला होते अनुपस्थित

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्याच्या 'संवाद' यात्रेवर आहेत. मरगळ आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणणं आणि पक्षाला लागलेली गळती रोखणं हा त्यांच्या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. या यात्रेत त्या त्या जिल्ह्यातले पक्षाचे ज्येष्ठ नेते हजेरी लावत आहेत. मात्र ही यात्रा जेव्हा नाशिकमध्ये आली तेव्हा सुप्रियाताईंच्या सोबत पक्षाचे दिग्गज नेते छगन भुजबळ दिसले नाहीत. नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला समजला जातो. गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीची नाशिकमधली एकहाती सत्ता ही भुजबळांच्या हातात होती. मात्र ते सध्या पक्षावर नाराज असल्याने त्यांनी संवाद यात्रेकडे पाठ फिरवत शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले होते.

राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हटलं जातं. विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातही याचाच प्रत्यय येत आहे. एकेकाळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादी गेलेल्या छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाने हेच पुन्हा एकदा दिसून आलं आहे. पक्षांतर्गत हेवेदाव्यांमुळे छगन भुजबळ यांनी जवळपास 28 वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. शिवसेना सोडून छगन भुजबळ हे आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत दाखल झाले.

Loading...

छगन भुजबळ यांनी पक्ष बदलला तेव्हा राज्यात आणि देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. भुजबळ तेव्हा सत्तेच्या आश्रयाला गेले. मात्र 2014 नंतर देशातील राजकीय परिस्थिती मोठा बदल झाला. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात छगन भुजबळ यांना तुरुंगातही जावं लागलं. शिवसेनेला आव्हान देऊन बाहेर पडलेल्या भुजबळांना आता पुन्हा एकदा शिवसेना जवळची वाटू लागली आहे. आता भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर कसा परिणाम होतो, हे पाहावं लागेल.

VIDEO : संभाव्य भाजपप्रवेशावर उदयनराजेंची गुगली, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...