दुष्काळाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ आक्रमक

दुष्काळाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ आक्रमक

जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना प्रशासन काय करतंय? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.

  • Share this:

नाशिक, 2 मे : भीषण दुष्काळामुळे महाराष्ट्र होरपळत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना प्रशासन काय करतंय? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ आणि येवला गावातील शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी स्वीकारलं आहे.

काय आहेत भुजबळांच्या मागण्या?

- मागेल त्याला पाणी द्या,चारा द्या

- रोहयो कामं सुरू करा

- पाणी नाही म्हणून शेती धोक्यात

- येवला तालुक्यातील अनेक गावांत भीषण पाणीटंचाई

- दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्ज वसुली नोटीस थांबवा

- फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख सरकारी मदत घ्यावी

- कृषी पंप वीज बिल माफ करावं

- पीक विमा अनुदान त्वरीत वाटप करा

- शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना सूचना द्या

- 6 महिने खातं सुरू असण्याचा नियम शिथिल करायच्या सूचना द्या

VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

First published: May 2, 2019, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading