..तर पक्षावर ही वेळ आली नसती, राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षांची सणसणीत चपराक

मुंबई अध्यक्षपद मला मिळाले असते तर पक्षावर आज ही वेळ आली नसती, अशी सणसणीत चपराक भास्कर जाधव यांनी लगावली आहे. भास्कर जाधव गुरूवारी सिंधुदुर्गात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 04:36 PM IST

..तर पक्षावर ही वेळ आली नसती, राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षांची सणसणीत चपराक

दिनेश केळुसकर, (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग, 25 जुलै-राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडत हाती शिवबंधन बांधले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आपण मुंबई अध्यक्षपद मागितले होते. पण, त्यांनी ते दिले नाही. मुंबई अध्यक्षपद मला मिळाले असते तर पक्षावर आज ही वेळ आली नसती, अशी सणसणीत चपराक भास्कर जाधव यांनी लगावली आहे. भास्कर जाधव गुरूवारी सिंधुदुर्गात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. यावेळी जाधव यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.

पक्षाच्या स्थितीकडेही नेतृत्त्वाचे दुर्लक्ष..

कोकणातल्या पक्षाच्या स्थितीकडेही राष्ट्रवादी नेतृत्त्वाने दुर्लक्ष केले आहे, अशी खंतही भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Loading...

मुंबईत राष्ट्रवादी अधिकच कमकुवत...

मूळात 1999 पासून पंधरा वर्ष सत्तेत असूनही राष्ट्रवादी फारसा प्रभाव मुंबईत नव्हता. सेनेतून छगन भुजबळ एनसीपी पक्षात आले आणि मुंबईत चेहरा मिळाला. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन अहिर यांनी मुंबईत कामगार संघटना बांधल्या आणि त्यामाध्यमातून एनसीपी थोडी बहुत बांधली. म्हाडा अध्यक्ष नंतर गृहनिर्माण राज्यमंत्री असा राजकीय प्रवास करत अहिर आर्थिक आणि राजकीय प्रबळ होत गेले. वरळी विधानसभेत मराठी माणूस आणि सेनेचा एकेकाळी बालेकिल्ला अहिर यांनी पूर्ण ताब्यात घेतला. मुंबईच्या मध्यवर्ती भागावर अहिर यांचे वर्चस्व थेट शरद पवार यांच्या निकटवर्तीय अहिर यांना घेऊन गेले. मग सचिन अहिर हे भुजबळापेक्षा ही पवारांच्या जवळचे झाले. अजित पवार यांनी सचिन अहिर यांना पर्याय करण्यासाठी किरण पावसकर या सेनेची मुशीतून तयार झालेल्या कामगार नेत्याला एनसीपी पक्षात आणले खरे पण अजित पवारांची 'खेळी' काही थोरल्या काकांनी चालू दिली नाही.

नवाब मलिक, संजय दिना पाटील यांनी ही वारंवार सचिन अहिर यांच्या विषयी तक्रारी केल्या तरी शरद पवार यांचे कायम आशिर्वाद अहिर यांनाच राहिले, गणित फिरालयला सुरूवात झाली ती 2014 विधानसभा निवडणुकीत... शिवसेना, भाजपा आण् एनसीपी तिरंगी लढत होत सचिन अहिर यांचा बालेकिल्ला उद्धवस्त केला. मग त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत ही वरळीत सर्व नगरसेवक हे शिवसेनेने जिंकले. एनसीपी अहिर यांचा बालेकिल्ला आता पूर्ण सेनेनी उद्धवस्त झाला, आता 2019 मध्ये ही आदित्य ठाकरे यांना सर्वाधिक सोपा मतदार संघ म्हणून वरळी विधानसभा मतदार संघाची चर्चा सुरू झाली ती नेमकी त्यासाठीच.. सचिन अहिर यांना एनसीपी पक्षाने इतके दिले की गिरणी कामगार नेतां ते मुंबईत सत्ताकेंद्रीय स्थान. पण वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्यासमोर विरोधात कोणीच नको, अशी कदाचित भविष्यात डोक्यात घेत सेनेच्या स्थानिक लोकांनाच कट्टर विरोधक असलेल्या अहिर यांना शिवबंधनात बांधत सेनेचे युवासम्राट यांचा मार्ग खुला केला आहे का, अशीच चर्चा आता राजकीय वर्तृळात रंगली आहे.

VIDEO :...म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, सचिन अहिर यांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...