मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तेरे बाप का गाव है क्या? राष्ट्रवादीच्या नेत्याची कामगारांना मारहाण, पाहा हा VIDEO

तेरे बाप का गाव है क्या? राष्ट्रवादीच्या नेत्याची कामगारांना मारहाण, पाहा हा VIDEO

 राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी बीडमध्ये भाजप सरपंचाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना राष्ट्रवादीच्या नेत्याने मोहोळमध्ये कामगारांना मारहाण केली आहे.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी बीडमध्ये भाजप सरपंचाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना राष्ट्रवादीच्या नेत्याने मोहोळमध्ये कामगारांना मारहाण केली आहे.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी बीडमध्ये भाजप सरपंचाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना राष्ट्रवादीच्या नेत्याने मोहोळमध्ये कामगारांना मारहाण केली आहे.

  • Published by:  sachin Salve

पंढरपूर, 25 जानेवारी : राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी बीडमध्ये भाजप सरपंचाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी

इंडियन ऑल कंपनीच्या कामगारांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मोहोळ तालुक्यातील देगाव परिसरातील ही घटना आहे. सोलापूर जिल्ह्यातून इंडियन ऑईल कंपनीची पाइपलाइन गेली आहे. कंपनीने शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात मोबदला दिला आहे. त्या पद्धतीने येथील शेतकऱ्यांना मोबदला द्यावा या मागणीसाठी त्यांनी कंपनीच्या कर्मचारी आणि कामगारांना त्यांनी शिवगीळ आणि मारहाण केली.

उमेश पाटील यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तत्यांनीच कायदा हातात घेऊन गुंडगिरी केल्याच्या या प्रकाराने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

बीडमध्येही भाजपच्या सरपंचाला मारहाण

दरम्यान, बीडमधील पाटोदा रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या कार्यकर्ते हे धनंजय मुंडे यांचं समर्थक असल्याचा आरोप पांडुरंग नागरगौजे यांनी केला होता.

धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली होती म्हणून मारहाण करण्यात आली असा दावाही या कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्ट टाकून केला. तसंच फेसबुकवर पोस्ट टाकून सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना धमकीही देण्यात आली. 'धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायची लायकी नाही. लायकीनुसार बोलं नाहीतर थेट 302 करण्याची धमकी देण्यात आली.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांच्या भावाची मुजोरी, कामगाराला केली मारहाण

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी काही कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कुर्ल्याजवळच्या चुनाभट्टी भागात रस्त्याचं काम सुरू होतं. तिथे 4 कामगारांना कप्तान मलिकांनी मारहाण केली. यापुढे इथे दिसलात तर हाय-पाय कापून ठेवीन, अशी धमकीही त्यांनी दिली. कप्तान मलिक यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या कामावरून मारहाण केल्याने खळबळ उडालीय. रस्त्यावर एका ढिकाणी खोदकाम केलं होते आणि त्याठिकाणी फायबर केबलचं कामही सुरू होतं, या ठीकाणी मलिक आले आणि त्यांनी कामगारांकडून वर्क ऑर्डरची मागणी केली.

मात्र त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नसल्याचा आरोप करत मलिक यांनी त्यांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांना धमकी देखील दिली. जा पोलीस ठाण्यात जा आणि माझ्या विरोधात तक्रार कर,यापुढे इथे दिसलात तर हात पाय तोडून टाकू असंही ते म्हणाले. हा व्हिडीओ 1 महिन्या पूर्वीचा आहे, अशी प्रतिक्रिया कप्तान मलिक यांनी दिली होती.

First published:

Tags: Beed, Beed news, Dhanjay munde, NCP