राष्ट्रवादी सोडणाऱ्या भास्कर जाधवांविरोधात जिल्हाध्यक्ष आक्रमक, सडकून टीका

राष्ट्रवादी सोडणाऱ्या भास्कर जाधवांविरोधात जिल्हाध्यक्ष आक्रमक, सडकून टीका

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भास्कर जाधवांचा दावा खोडून काढत जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 12 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष गुहागरचे आमदार भास्कर जाधव उद्या आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा भास्कर जाधवांकडून करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भास्कर जाधवांचा दावा खोडून काढत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'भास्कर जाधव यांना पक्षाने खूप काही दिले. शिवसेनेतून आल्यानंतर त्यांना पवारसाहेबांनी विधान परिषदेवर घेतले, मंत्रिपद दिले आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पददेखील दिलं. असं असताना ते पुन्हा सेनेत जात आहेत, यांचं आम्हाला दुःख आहे. मात्र जिल्ह्यात एक दोन जिल्हा परिषद सदस्य वगळता त्यांच्यासोबत कोणीही जाणार नाही. तसा ते करत असलेला त्यांचा दावाही खोटा आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीच्या जिल्हाधक्षांनी भास्कर जाधवांवर टीकास्त्र सोडलं आहे.

'भास्कर जाधवांविरोधात लढण्यासाठी तिघे इच्छुक'

भास्कर जाधव शिवसेनेत गेल्यानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी तीन जणांचे उमेदवारी अर्जृदेखील प्राप्त झाल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पक्षांतर करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भास्कर जाधवांची आगामी विधानसभा निवडणुकीत कोंडी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाणार आहे.

'त्या' आमदाराबाबतचा दावा खोडला

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार भास्कर जाधव तर सेनेत गेले, पण दुसरे दापोलीचे आमदार संजय कदम यांचाही भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र भाजपमध्ये जाण्याच्या आमदार संजय कदम यांच्याबाबतच्या चर्चेला देखील त्यांनी पूर्ण विराम दिला आहे. आमदार संजय कदम हे राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे बाबाजीराव जाधव यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पक्ष सोडणाऱ्या भास्कर जाधवांवर हल्ला चढवल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

SPECIAL REPORT: लातूरमधील भाजपच्या गटबाजीचा फायदा राष्ट्रवादीला?

Published by: Akshay Shitole
First published: September 12, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading