'घराची रेकी झाली...माझी हत्या करण्याचे ठरले', जितेंद्र आव्हाडांनी जाहीररित्या मांडलं दु:ख

'घराची रेकी झाली...माझी हत्या करण्याचे ठरले', जितेंद्र आव्हाडांनी जाहीररित्या मांडलं दु:ख

तरुणाने थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणानेही वेग पकडला.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : ठाण्यातील एका तरुणाने मारहाणीचा गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या चर्चेत आहेत. 'जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिल्याने त्यांच्या कार्यकर्ते आणि पोलिसांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून मला मला मारहाण केली,' असा आरोप संबंधित तरुणाने केला.

तरुणाने थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणानेही वेग पकडला. भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करा, अशी मागणी केली. तसंच भाजपच्या इतर नेत्यांनीही आव्हाडांवर जोरदार टीका केली. या सर्व टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपलं दु:ख जाहीरपणे मांडलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं असून त्यांना सोशल मीडियावर देण्यात येत असलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तसंच आपल्या भावनाही मांडल्या आहेत. 'हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली...कुणी केली... हत्या करण्याचे ठरले...कोण होते त्यात...असो...आईचे आशीर्वाद...पोलीस कारवाई करतील यावर,' असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड आणि वाद

'जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या संरक्षणासाठी असलेल्या सरकारी पोलिसांनी अभियंत्याला उचलून आणले आणि आव्हाड यांच्या बंगल्यावर आणून बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हे उपस्थित होते आणि त्यांच्यादेखत ही मारहाण केली गेली,' अशी तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. हा तरूण पेशाने इंजीनिअर असून तो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.

आव्हाडांचं स्पष्टीकरण

सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ज्या तरुणाने त्याला माझ्या देखत आणि माझ्या माणसांनी मारहाण केलीये अशी तक्रार केली त्याला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी सतत 24 तास माझ्या मतदार संघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण हा प्रकार मला मीडिया मार्फत कळाला असा खुलासाही त्यांनी केला.

'तुझा दाभोलकर होणार'

'तुझा दाभोलकर होणार,' अशी धमकी एका तरुणाने ट्विटरवरुन जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे. तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर ही धमकी देण्यात आली आहे. एका कॅबिनेट मंत्र्यालाच अशा प्रकारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड काही लोकांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर आता अशी उघड धमकी देण्यात आल्यानंतर याबाबत आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल.

संपादन- अक्षय शितोळे

First published: April 9, 2020, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading