Home /News /maharashtra /

जयंत पाटलांनी खास शैलीत देवेंद्र फडणवीसांना केलं ट्रोल

जयंत पाटलांनी खास शैलीत देवेंद्र फडणवीसांना केलं ट्रोल

जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपल्या नेहमीच्या शैलीत ट्रोल केलं आहे.

    विवेक कुलकर्णी, मुंबई, 7 जानेवारी : राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. 'फ्री काश्मीर'च्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपल्या नेहमीच्या शैलीत ट्रोल केलं आहे. 'फ्री काश्मीर' म्हणजे सर्व प्रकारचे भेदभाव, मोबाईल नेटवर्कवरची बंदी ते केंद्राच्या नियंत्रणापर्यंत सगळ्याच गोष्टीबाबत काश्मीर मोकळा हवा आहे, असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या सारख्या एका जबाबदार नेता द्वेषयुक्त पद्धतीने अर्थ लावून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय यावर माझा विश्वास बसत नाही,' असा उपरोधिक टोला पाटील यांनी लगावला आहे. 'मोदी-शहांना जे हवे तेच घडताना दिसत आहे, देश संकटात आहे' 'हे सत्ता गेल्यामुळे होतंय की स्वनियंत्रण गेल्याचा परिणाम आहे,' असा बोचरा सवालही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. आता यांवर फडणवीस काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर गेटवे ऑफ इंडियासमोर तरुणांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान झळकावण्यात आलेल्या 'फ्री काश्मीर' पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. या फलकावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. FREE KASHMIR म्हणजे काय? पोस्टर झळकावणाऱ्या मुलीचं स्पष्टीकरण गेटवे ऑफ इंडियासमोर फ्री काश्मीरचा फलक घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या मुलीनेच आता त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महेकने म्हटलं की, भारतापासून काश्मीर स्वतंत्र कऱण्यासाठी नाही तर तिथल्या लोकांनाही इतर भारतीय नागरिकांप्रमाणे स्वातंत्र्य मिळावं म्हणून हा फलक झळकावला. अजित पवार हे माझे बॉस नाहीत - अशोक चव्हाण 'आपण इथं राहून तिथल्या अडचणी, समस्या समजून घेऊ शकत नाही. आपण जसे स्वतंत्र आहोत तसंच स्वातंत्र्य काश्मीरमधील लोकांनाही मिळायला पाहिजे. मी मुंबईची आहे तरीही हे बोलत आहे. काश्मीरी लोकांच्या पाठिमागे आपण उभा राहिलं पाहिजे. गेल्या 150 दिवसांपासून तिथले सर्व व्यवहार ठप्प आहेत. आपण असे दिवस काढू शकणार नाही. आपल्या या लढ्यात काश्मिरी नागरिकांना सोबत ठेवून त्यांनाही स्वातंत्र्य मिळावं एवढीच माझी मागणी आहे,' असं फ्री काश्मीरचा पोस्टर झळकावणाऱ्या महेक हिनं म्हटलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Devendra Fadanvis, Jayant patil

    पुढील बातम्या