Home /News /maharashtra /

धनंजय मुंडेंच्या घड्याळाची वेळ चुकतेय? जाहीर कार्यक्रमात बोलताच आले नाही!

धनंजय मुंडेंच्या घड्याळाची वेळ चुकतेय? जाहीर कार्यक्रमात बोलताच आले नाही!

धनंजय मुंडे यांच्या घड्याळाची वेळ चुकतेय का? अशी चर्चा आता बीडच्या राजकारणात सुरू झाली आहे.

    सुरेश जाधव, बीड, 26 जानेवारी : राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व असतं. एकदा वेळ चुकली तर राजकीय नेत्यांना त्याचा चांगलाच फटका बसतो. मग ती वेळ निर्णय घेण्याची असो वा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची. त्यातही मंत्रिपद मिळाल्यानंतर तर नेत्यांभोवती कार्यकर्त्यांचा मोठा गराडाच तयार होतो. त्यामुळे अचूक वेळ साधणं नेत्यांना अशक्य होऊन जातं. याचाच काहीसा अनुभव राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना येताना दिसत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या घड्याळाची वेळ चुकतेय का? अशी चर्चा आता बीडच्या राजकारणात सुरू झाली आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर परळी शहरात आयोजित दोन जाहीर कार्यक्रमामध्ये फक्त उशीर झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना भाषण करता आले नाही. परळी शहरात आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात कार्यक्रमाला रात्री 10 वाजताची  मर्यादा होती. मात्र धनंजय मुंडेंना मुख्य कार्यक्रमात येण्यासाठी 11 वाजल्याने नागरी सत्काराला उत्तर देता आले नाही. त्यानंतर आज पुन्हा एकदा बहुचर्चित परळी-पिंपळा धायगुडा आंबेजोगाई रस्त्याचे उद्घाटन आयोजित केले होते. मात्र उद्घाटन कार्यक्रमस्थळी येण्यासाठी 9.40 मिनिटं झाल्याने फ़क्त कार्यक्रमाचा नारळ फोडून कार्यक्रम संपला असे जाहीर केले. यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेचे भाषण परळीकरांना ऐकता आले नाही. यामुळे धनंजय मुंडेच्या घड्याळाचं गणितं चुकत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? अदनानच्या पद्म पुरस्काराला मनसेचा विरोध 25 जानेवारी रोजी परळी शहरात धनंजय मुंडे यांच्या हस्ते 5 वाजता बहुचर्चित परळी आंबेजोगाई रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी एस के कॉन्ट्रक्शन यांनी मोठे स्टेज आणि बैठक व्यवस्था केली होती. मात्र परळी तालुक्यातील आढावा बैठक 9.30 वाजेपर्यंत चालल्याने पुन्हा एकदा धनंजय मुंडेना फक्त नारळ फोडून कार्यक्रम आटोपून घ्यावा लागला. त्यामुळे सामान्य परळीकरांना धनंजय मुंडेच्या जाहीर भाषणाला मुकावे लागले. दरम्यान, रात्री 10 चा कायदा म्हणून नागरी सत्कार सोहळ्यात फक्त सत्कार स्वीकारून समाधान मानावं लागले. आता हा परळीमधील दुसरा जाहीर कार्यक्रम रद्द झाल्याने परळीत या कार्यक्रमाची चर्चा होत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Dhananja munde, NCP

    पुढील बातम्या