छगन भुजबळांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, पहिल्याच बैठकीत रुद्रावतार

छगन भुजबळांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, पहिल्याच बैठकीत रुद्रावतार

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कामचुकार अधिकाऱ्यांना छगन भुजबळ यांचा रुद्रावतार बघायला मिळाला.

  • Share this:

प्रशांत बाग, नाशिक, 19 जानेवारी : नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली. यावेळी छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना कामं का होत नाहीत, असं म्हणत भुजबळांनी दहा दिवसांचा अल्टिमेटम अधिकाऱ्यांना दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कामचुकार अधिकाऱ्यांना छगन भुजबळ यांचा रुद्रावतार बघायला मिळाला. नियोजन समितीची पहिलीच बैठक नुकतीच पार पडली. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.  कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना, तो खर्चच होत नसल्याचं आढळून आल्यानंतर, भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.

...तर पुण्यातही नाईट लाईफ सुरू करणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

10 दिवसांनंतर पुन्हा एकदा बैठक बोलावून कामाचा आढावा घेतला जाईल, त्यात जर हलगर्जीपणा दिसून आला तर थेट कारवाई होईल असा इशाराच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. मागच्या सरकारच्या काळात नेमकं काय काम झालं हे उघड आहे असं म्हणतानाच, सगळं आकाशच फाटलेला आहे, कुठे कुठे ठिगळ लावायचं, असा उद्विग्न सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

अभिनेत्री शबाना आझमींच्या अपघातानंतर PM मोदींनी केलं ट्वीट

दरम्यान, छगन भुजबळ यांनी या वेळी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, कृषी विभाग या सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या पहिल्याच बैठकीमध्ये भुजबळांनी आपला रुद्रावतार दाखवल्याने, अधिकार्‍यांना देखील घाम फुटला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 09:20 AM IST

ताज्या बातम्या