• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'पार्थ पवार माझे चांगले मित्र, ते चुकीचं पाऊल उचलणार नाहीत', राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केला विश्वास

'पार्थ पवार माझे चांगले मित्र, ते चुकीचं पाऊल उचलणार नाहीत', राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केला विश्वास

जालन्यात बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पक्षातील संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे.

  • Share this:
जालना, 15 ऑगस्ट : कुटुंबातील वादंगानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार हे नक्की काय भूमिका घेणार, याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच जालन्यात बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पक्षातील संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे. 'पवार कुटुंब हे आदर्श कुटुंब असून सर्वकाही व्यवस्थित होणारच आहे. पवार कुटुंबियांशी माझे दोन पिढीचे कौटुंबिक संबंध आहेत. पार्थ पवार माझे चांगले मित्र आहेत ते काहीच चुकीचं पाऊल उचलणार नाहीत,' असा विश्वास राजेश टोपेल यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ यांच्याबाबत केलेल्या टिप्पणी वरून वातावरण ढवळून निघाले असताना आज बारामतीत पार्थ पवार ,अजित पवार ,सुनेत्रा पवार हे अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास यांच्याकडे दुपारचं जेवण घ्यायला एकत्र येणार आहेत. अर्थात हे घरगुती स्नेहभोजन आहे. मात्र काल पुण्यात पार्थ यांनी प्रताप पवार आणि अभिजित पवार यांची गाठ घेतली. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या विधानानंतर अजित पवार, पार्थ पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जयंत पाटील यांनी पार्थ किंवा अजित पवार हे नाराज नाहीत असं स्पष्ट केलं आहे. तसंच आजोबांना नातवाला बोलण्याचा अधिकार आहे याकडं पवारांचे निकटवर्तीय लक्ष वेधत आहेत मात्र या घडामोडीमुळे एकूणच पार्थ हे गप्प राहणार काी मौन सोडणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पार्थ यांच्या सुशांतससिंह राजपूत आणि राम मंदिर याबाबतच्या टिप्पणी मागचा बोलविता धनी कोण असे तर्क वितर्क लढवले जात आहेत.
Published by:Akshay Shitole
First published: