मुंबई, 18 फेब्रुवारी : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या राजकीय नेत्यांनाही या व्हायरसची झपाट्याने लागण होत असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राजेश टोपे यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी,' असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021
ठाकरे सरकारचे मंत्री कोरोनाच्या विळख्यात
लॉकडाऊननंतर राबवण्यात येत असलेल्या अनलॉक प्रक्रियेनंतर बंद करण्यात आलेल्या विविध गोष्टी पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे साहजिकच मंत्र्यांची लोकांमधील उठबसही वाढली. परिणामा आता ठाकरे सरकारमधील मंत्रीच कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत.
हेही वाचा - पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू
अलिकडेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील आणि मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता राजेश टोपे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Rajesh tope