VIDEO : शिवभोजनच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अजित पवारांनी घेतली फिरकी, हसून-हसून सगळेच लोटपोट

VIDEO : शिवभोजनच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अजित पवारांनी घेतली फिरकी, हसून-हसून सगळेच लोटपोट

अजित पवार यांनी विचारलेल्या गमतीशी प्रश्नांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे, 26 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनावेळी अजित पवार यांनी विचारलेल्या गमतीशीर प्रश्नांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

'हे कुणाचं हॉटेल आहे? इथं किती जणांना जेवण दिलं जातं? गरजू ,गरीब कसे ओळखणार? काही लोक मुद्दाम साधे कपडे घालून येतील...', असं म्हणत अजित पवार यांनी उद्घाटन करताना शिवभोजन योजनेच्या चालकांची चांगलीच फिरकी घेतली. यावेळी उत्तर देताना योजनेच्या चालकांची काहीशी भंबेरी उडाल्याचंही पाहायला मिळालं.

100 ग्रॅम भाजी...150 ग्रॅम भात, अशी असेल शिवभोजन योजनेतील 10 रुपयांची थाळी

शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना 10 रुपयात जेवण उपलब्ध करून घ्यायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेशही आता काढण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिवभोजन सुरू होणार आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज सुमारे 150 नागरिक या योजनेचा लाभ दुपारी 11 ते 2 या वेळात घेऊ शकणार आहेत. या भोजनालयात एकावेळी किमान 25 लोक बसू शकतील एवढी आसनव्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे.

अशी असेल थाळी

- 30 ग्रामच्या 2 चपात्या

- 100 ग्रॅम भाजीची वाटी

- 150 ग्रॅम भात

- 100 ग्रॅम वरण

तुम्हीही चालवू शकता शिवभोजन योजना

तुम्हाला जर राज्याच्या या उपक्रमात वाटेकरी व्हायचं असेल तर सरकारने यासाठी तरतूद केली आहे.

- शिव भोजनालय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पर्याप्त जागा असणे गरजेचे आहे.

- योजना राबविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येईल.

- महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल.

शेतकऱ्याने शक्कल लढवली आणि 1 एकरमध्ये घेतलं लाखोंचं उत्पन्न

- गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असलेल्या जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये यासारख्या ठिकाणी थाळीची विक्री केली जाईल.

- योजनेवर संनियंत्रण, पर्यवेक्षण ठेवण्यासाठी राज्य स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असेल. ही समिती सर्व पर्यायांचा विचार करून योजनेचा पुढील टप्पा ठरविण्याची कार्यवाही करेल.

- सेंट्रल किचन, नामवंत स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक न्यास व सीएसआर आणि व्हीएसटीएफ इत्यादींच्या सहभागाबाबत निर्णय घेईल आणि शासनाच्या सहभागाबद्दल रुपरेषा ठरवेल.

त्याचप्रमाणे, ही योजना शाश्वत आणि टिकणारी होण्यासाठी समिती क्रॉस सबसिडी आणि सार्वजनिक- खाजगी भागीदारीचे तत्व वापरण्यावर भर देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2020 11:31 AM IST

ताज्या बातम्या