मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : 'तुमच्यातीलच एखादा ज्योतिरादित्य होईल...' अजित पवारांनी अशी बॅटिंग केली की विरोधकही हसून-हसून लोटपोट

VIDEO : 'तुमच्यातीलच एखादा ज्योतिरादित्य होईल...' अजित पवारांनी अशी बॅटिंग केली की विरोधकही हसून-हसून लोटपोट

अजित पवार हे त्यांच्या खास शैलीतील फटकेबाजीसाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा सभागृहात आला आहे.

अजित पवार हे त्यांच्या खास शैलीतील फटकेबाजीसाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा सभागृहात आला आहे.

अजित पवार हे त्यांच्या खास शैलीतील फटकेबाजीसाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा सभागृहात आला आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 13 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या खास शैलीतील फटकेबाजीसाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा सभागृहात आला आहे. 'मध्य प्रदेशसारखं महाराष्ट्रातही कोणी तरी ज्योतिरादित्य शिंदे होईल,' असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी विनोदी शैलीत तुफान फटकेबाजी केली. 'तुम्ही काही म्हणालात तरीही आमच्याकडे कोणीही ज्योतिरादित्य होणार नाही. तुम्हीच जरा काळजी घ्या, नाहीतर तुमच्यातच कोणीतरी ज्योतिरादित्य होईल. तुमचे आमदार कधीही उधळतील, त्यांना सांभाळा,' असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला. तसंच अजित पवार यांनी आमदारांना झालेला निधी वापट आणि फडणवीस यांच्यासोबत घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ याबाबतही रोखठोक भाष्य केलं. अजित पवारांचं प्रत्युत्तर... “राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल अंस म्हणत पुढची पाच वर्ष तिथं काढलीत तरी चालतील. असं सांगतंच तुम्हाला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. नाही तर तुमचीच माणसं इकडे तिकडे जातील. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा, अशा शब्दात त्यांनी मुनगंटीवारांना प्रत्युत्तर दिलं. सध्या विधानसभेत बरेच जण गैरहजर आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवा,” असं खोचकं विधान अजित पवार यांनी यावेळी केलं. अजित पवार यांचे हे भाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार? विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आम्ही जे काही ठरविले होते, त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारकत घेतली. त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी फारकत घेतली, असं धक्कादायक विधान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला, असा घरचा आहेर मुनगंटीवार यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना दिला आहे. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच. राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्य़ा चर्चेत मुनगंटीवार बोलत होते.
First published:

Tags: Ajit pawar, Vidhansabha

पुढील बातम्या