मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अँकर झालेल्या सुप्रिया सुळेंनी वाचली अजित पवारांची बातमी, पाहा VIDEO

अँकर झालेल्या सुप्रिया सुळेंनी वाचली अजित पवारांची बातमी, पाहा VIDEO

खासदार सुप्रिया सुळे या आज वक्ता नव्हे तर थेट वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या.

खासदार सुप्रिया सुळे या आज वक्ता नव्हे तर थेट वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या.

खासदार सुप्रिया सुळे या आज वक्ता नव्हे तर थेट वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या.

जळगाव, 28 फेब्रुवारी : राजकीय नेते अनेकदा कॅमेऱ्यासमोर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडत असतात. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या आज वक्ता नव्हे तर थेट वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. वृत्तनिवेदिका म्हणून सुप्रिया सुळे यांनी बातमी वाचली ते राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. याबाबतचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे.

जळगावातल्या डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयातील "सेंटर फॉर मास मीडिया & फॉरेन लॅंग्वेज विभागातील व्हिडीओ स्टुडिओत सुप्रिया सुळे यांनी बातम्या सादर केल्या. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि त्यावरील अजित पवारांची प्रतिक्रिया याचा या बातमीत समावेश होता.

एकीकडे, सुप्रिया सुळे यांनी वृत्तनिवदेन करत बातम्या दिल्या तर दुसरीकडे जळगावातच त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला बांगड्या दाखवत निषेध करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीका करताना बांगड्या घातल्याचा उल्लेख केला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाचा निषेध करत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला बांगड्या भरून निषेध करण्यात आला. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही महिलांना बांगड्या भरत ह्या वाक्याचा निषेध केला. आम्ही महिला आहोत याचा आम्हाला गर्व आहे. म्हणून आम्ही बांगड्या भरत होतो, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

First published:

Tags: Jalgaon, Supriya sule