राज्याच्या राजकारणाला कलाटणी, बीडचा दौरा रद्द करून अजित पवार खडसेंच्या भेटीला?

राज्याच्या राजकारणाला कलाटणी, बीडचा दौरा रद्द करून अजित पवार खडसेंच्या भेटीला?

सत्ताधारी भाजपलाच मोठं खिंडार पडू शकतं, अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 3 ऑक्टोबर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर केलं. काँग्रेसला धक्का देत राधाकृष्ण विखे पाटील बाहेर पडले तर राष्ट्रवादीतून गणेश नाईक आणि उदयनराजेंसह अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले. पण त्यानंतर आता सत्ताधारी भाजपलाच मोठं खिंडार पडू शकतं, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजचा आपला नियोजित बीड दौरा रद्द केला. त्यानंतर आता अजित पवार भाजपचे दिग्गज नेते आणि सध्या पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी जळगावला रवाना झाल्याचं बोललं जात आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही. मात्र जर खरोखरच एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असतील तर विधानसभा निवडणुकीना वेगळी कलाटणी मिळू शकते.

एकनाथ खडसेंना भाजपने डावललं

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत बहुतांश उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र एकनाथ खडसे यांना मात्र अद्यापपर्यंत तिकीट देण्यात आलेलं नाही. एकनाथ खडसे यांनी विधानसभा न लढता त्यांच्या सूनेनं लढवावी, अशी भाजप नेतृत्वाची इच्छा असल्याची माहिती आहे. त्यामुळे नाराज खडसे दुसऱ्या पक्षाचाही विचार करू शकतात.

राष्ट्रवादीकडून आतापर्यंत जाहीर करण्यात आलेले उमेदवार :

Loading...

अजित पवार - बारामती

श्रीवर्धन - आदिती तटकरे

दिंडोशी - विद्या चव्हाण

सिन्नर - माणिकराव कोकाटे

कर्जत-जामखेड - रोहित पवार

नगर - संग्राम जगताप

येवला - छगन भुजबळ

इंदापूर - दत्तात्रय भरणे

माजलगाव - प्रकाश सोळंके

बीड - संदीप क्षीरसागर

परळी - धनंजय मुंडे

मुरबाड - प्रमोद हिंदुराव

हडपसर - चेतन तुपे

दौंड - रमेश थोरात

अणुशक्तीनगर - नवाब मलिक

गुहागर - सहदेव बेटकर

सातारा - दीपक पवार

कराड उत्तर - बाळासाहेब पाटील

फलटण - दीपक चव्हाण

पंढरपूर - भारत भालके

चिपळूण - शेखर निकम

केज - पृथ्वीराज साठे

जिंतूर - विजय भांबळे

घनसावंगी - राजेश टोपे

कागल - हसन मुश्रीफ

कोरेगाव - शशिकांत शिंदे

मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड

आंबेगाव - दिलीप वळसे

शेवगाव - प्रताप ढाकणे

तासगाव - सुमन पाटील

गेवराई - विजयसिंह पंडित

परांडा - राहुल मोटे

जळगाव शहर - अभिषेक पाटील

बाळापूर - संग्राम गुलाबराव गावडे

कारंजा - प्रकाश डहाके

मेळघाट - केवळराम काळे

अहेरी - धर्मरावबाबा आत्राम

दिग्रस - मो. तारीक मो. शमी

गंगाखेड - मधूसुदन केंद्रे

कन्नड - संतोष कोल्हे

नांदगाव - पंकज भुजबळ

बागलाण - दीपिका चव्हाण

देवळाली - सरोज अहिरे

कर्जत - सुरेश लाड

खेड आळंदी - दिलीप मोहिते

मावळ - सुनील शेळके

पिंपरी - सुलक्षणा शिलावंत

आष्टी - बाळासाहेब आजबे

माढा - बबनदादा शिंदे

मोहोळ - यशवंत माने

माळशिरस - उत्तमराव जानकर

चंदगड - राजेश पाटील

कुणा विरुद्ध कोण लढणार? या आहेत BIG FIGHTS, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...