...त्यांना आताच सावध करा परत चुकून झालं, अजितदादांनी दिला कडक इशारा

...त्यांना आताच सावध करा परत चुकून झालं, अजितदादांनी दिला कडक इशारा

जर कोणी बेकायदा सावकारीतून सर्वसामान्यांचे आर्थिक पिळवणूक करून दादागिरी करत असतील तर अशा लोकांवर मोक्का अथवा तडीपारीची कारवाई केली जाईल'

  • Share this:

बारामती, 25 जानेवारी : 'जर कोणी बेकायदा सावकारीतून सर्वसामान्यांचे आर्थिक पिळवणूक करून दादागिरी करत असतील तर अशा लोकांवर मोक्का अथवा तडीपारीची कारवाई केली जाईल. उद्या जर माफी मागायला कुणी मायेचा लाल जरी आला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी कडक इशारा दिला.

बारामती सहकारी बँकेच्या समारंभ सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या जाहीरपणे इशारा दिला आहे.

MS Dhoni New Look : एमएस धोनीने पुन्हा बदलला लूक, पाहा Photo

'बारामती शहर व तालुका प्रत्येक घटकाला आपला तालुका वाटावा यासाठी सर्वांगीण विकासासाठी अनेक कामे हाती घेतली आहेत. मध्यंतरीच्या काळात प्रीतम शहा यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली.  जर  कोणाचे नातेवाईक किंवा मित्र बेकायदा सावकारी करत असतील तर त्यांना आताच सावध करा परत चुकून झालं, दादा माफ करा असं म्हणत कोणी मायेचा लाल आला तरी  माफ करणार नाही, अशा इशारा अजितदादांनी दिला.

स्टंट करताना Mercedes ला आग; 70 लाखांची गाडी जळून खाक, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

तसंच, 'जर कोणी बेकायदा सावकारीतून सर्वसामान्यांचे आर्थिक पिळवणूक करून दादागिरी करत असतील तर अशा लोकांवर मोक्का अथवा तडीपारीची कारवाई केली जाईल, असा दमच अजित पवार यांनी दिला.

'शशिकांत शिंदेंकडे विचारपुस करणार'

दरम्यान, राष्ट्रवादीचे  नेते शशिकांत शिंदे यांना भाजपने 100 कोटीची ऑफर दिल्याबाबत अजित पवार यांना विचारले असता,  '27 तारखेला मुंबईत गेल्यावर शशिकांत शिंदे यांना मी सगळी माहिती विचारणार आहे. कुणी ऑफर दिली? कशाकरिता दिली? त्याच्यापाठीमागे कारण काय यावर माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही' अशी प्रतिक्रिया दिली.

'लवकरच पोलीस भरती'

'आरोग्य आणि जनतेच चांगलं राहण्याकरिता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या विभागाची भरती करणं गरजेचं आहे. भरती झाल्यानंतर पोलीस कामाला यायला किमान एक वर्ष लागत असतो. यामध्ये आपल्याला असं वाटतं की, जानेवारीत सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठासमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. मात्र, ते फेब्रुवारीमध्ये गेलं आहे. महाविकास आघाडीचा प्रयत्न हा आहे की, सगळी भरती करीत असताना कुठलाही घटक वंचित राहता कामा नये, त्यासाठी जी खबरदारी घ्यायचा प्रयत्न असेल ती घेण्याचा प्रयत्न सरकार घेईल' असंही अजित पवार म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: January 25, 2021, 1:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या