...म्हणून राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचारासाठी येत नाहीत, अजित पवारांनी केला खुलासा

...म्हणून राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचारासाठी येत नाहीत, अजित पवारांनी केला खुलासा

राजकारण तापलेलं असताना राहुल गांधी दूर का, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे मात्र प्रचाराचा मैदानात आतापर्यंत दिसलेले नाहीत. यापुढेही त्यांची सभा नक्की कधी होणार आहे, याबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. निवडणुकीत राजकारण तापलेलं असताना राहुल गांधी दूर का, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

'राहुल गांधी जर महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते झाकोळून जातील. त्यामुळे या नेत्यांना संधी देण्यासाठीच राहुल गांधी अद्यापपर्यंत महाराष्ट्रात आले नसतील, असं मला वाटतं,' असं उपरोधीक भाष्य अजित पवार यांनी राहुल गांधींवर बोलताना केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीश बोलताना अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमची भूमिका ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे, असं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर व्यासपीठांवरून सांगितलं आहे. 2014 साली सत्ता येण्याआधी याबाबतचं आश्वासनही भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्रातील जनमत लक्षात घेता भाजपने हा मुद्दा मागे सोडलेला दिसत आहे. मात्र अजित पवार यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

'आमच्या सत्तेला साडेचार वर्ष झाल्यानंतर आम्ही वेगळा विदर्भ करू. कारण राज्यासह केंद्रातही आमची सत्ता आहे. असं आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला खासगीत बोलताना सांगितलं होतं,' असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय खुलासा करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

Published by: Akshay Shitole
First published: October 12, 2019, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading