राष्ट्रवादीच्या तातडीच्या बैठकीआधी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या तातडीच्या बैठकीआधी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवर उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 2 नोव्हेंबर : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचा सत्तास्थापनेबाबत गोंधळ सुरू असताना राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 'राजकीय नेत्यांनी आणीबाणीच्या सारखं आततायी विधान करू नये. राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, आधी त्याला मदत करा,' असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

'राष्ट्रपती राजवटीची भाषा कोणी करत असेल तर तो प्रयत्न शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी होत असेल. पण असं काही होणार नाही. मुख्यमंत्री कुणाला करावा हा शिवसेना आणि भाजपचां निर्णय आहे. अनेकदा विधिमंडळाच्या सदस्य नसलेल्यांनाही मुख्यमंत्रिपद दिलं गेलं आहे,' असं म्हणत अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवर उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी आक्रमक होणार

'राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची उद्या बैठक घेण्यात येणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि पिकांचं झालेलं नुकसान याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर आम्ही राज्यभर दौरा करणार आहोत,' असं म्हणत अजित पवार यांनी आगामी काळात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक होणार असल्याची संकेत दिले आहेत.

छगन भुजबळ यांनीही केलं भाष्य

'शिवसेना आणि भाजपकडून सता स्थापनेला उशीर केला जात आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी ही उत्तम संधी आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा आततायीपणा आहे,' असं म्हणत छगन भुजबळ यांनी सत्तास्थापनेच्या संघर्षावर भाष्य केलं आहे.

VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...

First published: November 2, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading