पुण्यात कुणाला किती जागा? अजित पवारांनी जाहीर केलं जागावाटपाचं सूत्र

पुण्यात कुणाला किती जागा? अजित पवारांनी जाहीर केलं जागावाटपाचं सूत्र

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पुण्यातील जागांविषयी भाष्य केलं आहे.

  • Share this:

पुणे, 22 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी अजित पवार यांनी पुणे शहरातील जागावाटपही जाहीर केलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रिपणे युतीच्या आव्हानाचा सामना करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू होती. राज्यभरात आघाडीत कुणाला किती जागा मिळणार, याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीने अधिृकत घोषणा केलेली नाही. मात्र अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पुण्यातील जागांविषयी भाष्य केलं आहे.

पुणे शहरात आघाडीत कुणाला किती जागा?

एकूण जागा - 8

राष्ट्रवादी - 4 जागा(हडपसर, पर्वती, खडकवासला, वडगावशेरी )

काँग्रेस - 3 (शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट)

मित्रपक्ष - 1 (कोथरूड)

अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

- काश्मीरमधील 370 कलम आणि महाराष्ट्र निवडणूक यांचा काहीही संबंध नाही

- अजून काही भागात पाऊस काही तर काही भागात दुष्काळ

- पुण्यातही अनेक भागात टँकर

- पावसाळ्यातही या सरकारने लोकांना पाणी दिलं नाही

- महिला आंदोलन करत आहेत, हे सरकारचे अपयश

- पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांना यंदा तिकीट का नाही?

- राज्य कर्जबाजारी, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र?

- देशात बेरोजगारी आणि मंदी

VIDEO: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस येणार! अमित शाहांकडून मोठी घोषणा

Published by: Akshay Shitole
First published: September 22, 2019, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading