राष्ट्रवादीत 'ते' उमेदवारही झाले आमदार, अजित पवारांनी सांगितला गंमतीशीर किस्सा

राष्ट्रवादीत 'ते' उमेदवारही झाले आमदार, अजित पवारांनी सांगितला गंमतीशीर किस्सा

अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव, 17 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामचा शुभारंभ केला. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

'शेतकरी वर्गाला राज्यपालांनी दिलेली मदत समाधानकारक नाही. ही मदत वाढवून दिली पाहिजे. राज्यपालांची भेट घेऊन मदत वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. केंद्राने देखील मदत दिली पाहिजे,' अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसंच अजित पवार यांनी एक किस्सा सांगून सभेत हशा पिकवला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काहींना बळजबरीने विधानसभाचं तिकिटं दिली ते उमेदवारही निवडून आले आणि आमदार झाले, असं आपल्या खास स्टाईलमध्ये अजित पवार म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला.

विजय शिवतारेंवर पुन्हा निशाणा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. यावेळी अजित पवार यांनी विजय शिवतारेंना पुन्हा आमदारच होऊन दाखव, असं खुलं आव्हान दिलं होतं. त्यावर आता या जाहीर सभेत अजित पवारांनी पुन्हा भाष्य केलं आहे. 'विजय शिवतारे हे साहेब राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायचे, म्हणून मी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बोललो होतो. कसा आमदार होतोय तो. त्याप्रमाणे पुरंदरमध्ये संजय जगताप निवडून आले,' असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांची धमकी खरी ठरली!

निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्याविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. अजित पवार यांनी यावेळी शिवतारेंना खुलं आव्हानच दिलं होतं. 'शिवतारे तू परत आमदारच होऊन दाखव,' असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांनी अखेर आपला शब्द खरा करून दाखवला आहे. कारण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संजयकाका जगताप यांनी विजय शिवतारे यांचा दारूण पराभव केला आहे.

Special Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन

Published by: Akshay Shitole
First published: November 17, 2019, 1:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading