वाद चिघळणार! पवारांची महाजनांच्या नाचण्यावर आक्षेपार्ह टीका, BJPचा बॅनरमधून हल्लाबोल

नाशिकमधल्या राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अजित पवारांविरोधात निषेधाचं पोस्टर लावलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 09:47 AM IST

वाद चिघळणार! पवारांची महाजनांच्या नाचण्यावर आक्षेपार्ह टीका, BJPचा बॅनरमधून हल्लाबोल

नाशिक, 7 ऑगस्ट : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नाशिकमध्ये अजित पवारांनी महाजनांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत आपला राग व्यक्त केला आहे. नाशिकमधल्या राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अजित पवारांविरोधात निषेधाचं पोस्टर लावलं आहे. 'गिरीश महाजन यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या अजित पवारांचा जाहीर निषेध' अशा आशयाचं पोस्टर भाजप नगरसेवक शहाणे यांनी लावलं आहे. पोस्टरमध्ये त्यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना देशद्रोहीदेखील म्हटलं आहे. या पोस्टरबाजीमुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

(वाचा : सुष'माँ' स्वराज काळाच्या पडद्याआड, दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार)

अजित पवारांच्या पुतळ्याचं दहन

दरम्यान, अजित पवारांनी गिरीश महाजनांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानं नाशिकमधील भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

(वाचा : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा रेड अलर्ट, धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे महापुराचा धोका)

Loading...

अजित पवार यांची जीभ घसरली

मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी (5ऑगस्ट) घेतला. या निर्णयाचं स्वागत करत देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही आनंद साजरा करत चक्क डान्स केला आहे. त्यांच्या या वर्तणुकीवर अजित पवारांनी आक्षेप नोंदवत टीकास्त्र सोडलं.

अजित पवार म्हणाले की, नाशिकमध्ये पूरपरिस्थिती असताना काही मंत्री नाचत होते. नाचायचं काम तुमचं नाही, टीव्हीला बघितलं की नाही, काय चाललंय. पाणी आलेलं बघा; नाचताय काय, नाचायचं काम तुमचं नाही, नाचायचं काम नाचणारे करतील, इथे पूर आला आणि मंत्रिमहोदय नाचतात. असं म्हणत अजित पवार यांनी महाजनांवर आक्षेपार्ह टीका केली.

(पाहा : रायगड- मुरूड इथे दरड कोसळली, पाहा LIVE VIDEO)

गिरीश महाजनांचा पलटवार

अजित पवारांच्या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. जामनेरमध्ये पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, 'अजित पवारांना मला सांगायचं आहे, गेले तीन दिवस मी नाशिकमध्ये तळ ठोकून होतो. पूरग्रस्त भागात, कंबरभर पाण्यात फिरत होतो. त्यामुळे आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य होतं . आपल्या सत्तेच्या काळात आपण किती गांभीर्य ओळखून होते हे आम्हाला चांगला माहिती आहे. अजितदादा, पाणी मागणाऱ्यांना तुम्ही काय बोलला होतात हे विसरलात का?,  असं म्हणत महाजन यांनी अजित पवारांना टोला हाणला आहे.

VIDEO: पुरामुळे प्राण्यांचा जीव धोक्यात, पाहा बैलाचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 09:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...