अजित पवार थोड्याच वेळात माध्यमांसमोर, गौप्यस्फोट करणार?

अजित पवार थोड्याच वेळात माध्यमांसमोर, गौप्यस्फोट करणार?

अजित पवार आता माध्यामांसमोर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. अजित पवारांनी हा राजीनामा देताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा केली नाही. त्यामुळे याबाबतचा संभ्रम आणखीनच वाढला. राजीनाम्यानंतर अज्ञातवासात गेलेले अजित पवार आता माध्यामांसमोर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शरद पवार हे आपला नियोजित दौरा रद्द करून मुंबईत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबतच्या चर्चेनंतरच अजित पवार माध्यमांसमोर येतील, अशी माहिती आहे. त्यामुळे अजित पवार नक्की काय बोलतात, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवार यांनी फोनवरून शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला तुम्हाला भेटायचं आहे, असं शरद पवारांना सांगतलं. त्यावर शरद पवारांनी मुंबईत भेटू असं कळवल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्याची बैठक होणार आहे.

अजित पवारांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले शरद पवार?

अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी याबाबत खुलासा केला. 'आज दुपारी बैठका सुरू असताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी आमच्या कुणाशीही चर्चा केली नव्हती. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला तर त्यांनी दिलेलं कारण समजलं. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी माझ्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राज्यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. यातून बाहेर पडावं असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलाला दिला होता,' असं शरद पवारांनी सांगितलं. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अजित पवार नाराज झाले होते. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर चर्चा करेन, असंही पवार म्हणाले.

Loading...

'शिखर बँक प्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी उत्तर देण्यासाठी आज ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल २४ तारखेला मी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज गेलो होता. परंतु, काल संध्याकाळी ईडीच्या संचालकांनी मला न येण्याची विनंती केली होती. परंतु, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मला तिथे जाऊन आपली भूमिका मांडावी अशी विनंती केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी मला दोन वेळा विनंती केली की, कायदा सुवव्यस्थेची परिस्थिती विपरीत होऊ नये, म्हणून त्यांनी विनंती केली. त्यामुळे तिचा स्वीकार केला आणि ईडी कार्यालयामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला,' अशी माहितीही पवारांनी दिली.

अजितदादांचा राजीनामा कुटुंब कलहातून? शरद पवारांची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 11:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...