अजित पवार यांची जीभ घसरली.. गिरीश महाजन यांना म्हणाले 'नाच्या'

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची सोलापुरात जीभ घसरली. राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 02:36 PM IST

अजित पवार यांची जीभ घसरली.. गिरीश महाजन यांना म्हणाले 'नाच्या'

सागर सुरवसे (प्रतिनिधी)

सोलापूर, 6 ऑगस्ट- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची सोलापुरात जीभ घसरली. राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा नामोल्लेख न करता त्यांना 'नाच्या' असे संबोधले आहे. नाशिकमध्ये पूर आला तरी मंत्री नाचतात, नाच्याचे काम तुमचे नाही मंत्री, अशा शब्दात पवारांनी टोलाही लगावला आहे.

तुमची साथ असेल तर मी कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही..

अजून काही गोष्टी घडतील. काही लोक थांबतील तर कोणी आणखी निघून जाईल. सगळ्या भागातून आघाडीचे उमेदवार निवडून आले पाहिजे. आपला आकडा राज्यात 175 जागांचा आहे. आपल्याला राज्यात आघाडी सरकार आणायचे आहे. तुमची साथ असेल तर मी कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी जनतेला केले. 15 ऑगस्टला ग्रामपंचायतीत बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी करा, ईव्हीएमवर निवडणूक नको, अशी भूमिका घ्या. ईव्हीएम विरोधात मोर्चा काढू, असे अजित पवार यांनी या वेळी सांगितले.

पीकविमा म्हणजे फसवाफसवी..

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोन नेत्यांचा शेतीशी कधी संबंध आला का? पीकविमा म्हणजे फसवाफसवी असल्याची टीका अजित पवार यांनी केली. टीकोजीराव तीन वर्षांनतर कर्जमाफी देतात, आम्ही एका झटक्यात कर्जमाफी दिली. मते घ्यायची आहे. म्हणून कर्जमाफी मुदतवाढ दिली जात आहे. आता सरकार नोकरभरती करत आहे. पाच वर्षांत नोकऱ्या का दिल्या नाही.

पुणे जिल्ह्यातील धरणपुर्नवसन केले नाही, म्हणून मोठा अडचण निर्माण झाली आहे. मागील विधानसभेत नुकसान झाले. लोकसभेत झालेली चूक आता येणाऱ्या विधानसभेत सुधारणार आहे. जिल्ह्यात काँग्रेस एनसीपीच्या जागा आल्या पाहिजेत, असे आवाहान अजित पवार यांनी जनतेला केले आहेत.

कलम 370 चा निर्णय चांगला..

जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चांगला, त्यास आमचा विरोध नाही. पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घ्या, हीच इच्छा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार एकबाजूला टीका करतात तर दुसरीकडे अजित पवार कौतुक यांनी केले आहे. केंद्र सरकार विषयाचे बोलायचे नाही, राज्यातील मुद्दे येत्या विधानसभेत महत्त्वाचे आहेत.

VIDEO: पुण्यात पावसाचा जोर ओसरला पण शहर पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 02:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...