भाजप पक्षात घेण्यासाठी प्रलोभनं दाखवतं, फोडाफोडीवर अजित पवारांची टीका

भाजप पक्षात घेण्यासाठी प्रलोभनं दाखवतं, फोडाफोडीवर अजित पवारांची टीका

भाजपकडून वेगवेगळ्या भागातील नेत्यांना प्रलोभनं दाखवली जात आहेत. अनेक नेत्यांबद्दल वावड्या उठवल्या जातात.

  • Share this:

जितेंद्र जाधव, (प्रतिनिधी)

बारामती, 14 जुलै- भाजपकडून वेगवेगळ्या भागातील नेत्यांना प्रलोभनं दाखवली जात आहेत. अनेक नेत्यांबद्दल वावड्या उठवल्या जातात. गोव्यात तर काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या चार लोकांना बाजूला केले. आता अशीच नीती भाजप वापरात असल्याची घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

बारामतीत रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. येथील एका हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पवारांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली. दुसरीकडे, गेल्या अनेक महिन्यांपासून साखरेचा उठाव होत नाही. भाजपच्या अनेक नेत्यांचे साखर कारखाने आहेत. त्यांनी तरी याबाबत आवाज उठवावा, असं सांगतानाच ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी आपली कामं तरी करून घ्यावीत, असाही टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

प्रेम, आपुलकी, जिव्हाळा टिकावा हीच अपेक्षा, पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदारालाच टोल

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रपणे लढवणार आहेत. मागील निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्याने अनेक ठिकाणी जागांचा पेच निर्माण होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभेच्या जागेबाबतही शंका असल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांपैकी एकजण भाजपमध्ये प्रवेश करणार अशीच चर्चा रंगू लागली आहे, असं असतानाच रविवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भरणे यांना भरसभेत टोमणा मारला आहे.

इंदापूरचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांचं तमाम बारामतीकरांच्या वतीनं स्वागत असं म्हणतानाच असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा असं सूचक वक्तव्य अजितदादांनी केलंय. त्यामुळं भविष्यातील राजकीय घडामोडीचे वेध घेऊन तर हे वक्तव्य केलेलं नाही ना, असा सवाल उपस्थित होऊ लागलाय.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं साहजिकच इंदापूर विधानसभेची उमेदवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापैकी कोणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जातायत. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यास भरणे भाजपमध्ये जातील, असाही अंदाज बांधला जातोय. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हेही भाजपमध्ये जाणार अशाही वावड्या उठवल्या जातायत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर रविवारी बारामतीत एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हे एकत्र आले होते. यावेळी भाषण संपवताना अजित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराचं स्वतःच्या मतदारसंघात स्वागत केलं. इंदापूरचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांचं तमाम बारामतीकरांच्या वतीनं स्वागत असं म्हणतानाच असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलय. येत्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा अंदाज घेऊन अजितदादांनी असा टोमणा मारला नाही ना, अशीच चर्चा आता रंगलीय.

अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील राइड अचानक कोसळली, दुर्घटनेचा LIVE VIDEO

First published: July 14, 2019, 10:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading