अखेर अजित पवारांनी केला शरद पवार यांना फोन, म्हणाले...

अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 12:45 PM IST

अखेर अजित पवारांनी केला शरद पवार यांना फोन, म्हणाले...

मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. त्यानंतर ते अज्ञातवासात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अजित पवार यांनी फोनवरून शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला तुम्हाला भेटायचं आहे, असं शरद पवारांना सांगतलं. त्यावर शरद पवारांनी मुंबईत भेटू असं कळवल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्याची बैठक होणार आहे. या भेटीनंतर अजित पवार माध्यमांसमोर येणार का, हे पाहावं लागेल.

अजित पवारांनंतर समर्थकही आक्रमक, पिंपरी चिंचवडमधून पहिला राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनीही राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी पदाचा राजीनामा दिला.

'सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या सूडाच्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत,' असं जावेद शेख यांनी म्हटलं आहे. शेख यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता अजित पवारांचं समर्थन करण्यासाठी पक्षातील इतर नेते राजीनामा देण्यासाठी पुढे येत असल्याचं दिसत आहे.

Loading...

अजितदादांचा राजीनामा कुटुंब कलहातून? शरद पवारांची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 11:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...