पंतप्रधान मोदींचे आरोप खरे निघाले तर राजकारण सोडू, राष्ट्रवादीचा पलटवार

पंतप्रधान मोदींचे आरोप खरे निघाले तर राजकारण सोडू, राष्ट्रवादीचा पलटवार

पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांची भूमिका ही भारत विरोधी आहे. पण तिथले सामान्य नागरिक हे भारताचा व्देष करणारे नाहीत असं शरद पवार म्हणाले होते.

  • Share this:

मुंबई 19 सप्टेंबर : नाशिमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पाकिस्तानची स्तुती करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हरकत घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलंय. पवारांचं संपूर्ण भाषण तपासून पाहा, त्यात असं काही निघालं तर आम्ही राजकारण सोडू असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मलिक पुढे म्हणाले, पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांची भूमिका ही भारत विरोधी आहे. पण तिथले सामान्य नागरिक हे भारताचा व्देष करणारे नाहीत असं शरद पवार म्हणाले होते. त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात येत आहे असंही त्यांनी सांगितलं.

'तलाक' घेतल्यानंतर वंचित आणि MIM पुन्हा एकत्र येणार?

काय म्हणाले होते मोदी?

जम्मू-काश्मीर संदर्भात असो की पाकिस्तान बाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील शेजारचा (पाकिस्तान) देश चांगला वाटतो. त्यांना तिथले शासक चांगले वाटतात. दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर टीका केली. राज्यातील सत्ताधारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिक येथे झाला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्यासह देशपातळीवरील विषयांना हात घातला.

'राम मंदिराबाबत काही जणांकडून वाचाळपणा सुरू', मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा?

मुख्यमंत्र्यांचाही पवारांवर निशाणा

मुख्यंत्री म्हणाले, तुमची मानसीकता राजेशाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या खतावणी ठेवतो या वक्तव्याचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी हे अखिल विश्वात लोकप्रिय नेते आहेत. 370 कलम रद्द करण्याचं अभूतपूर्व काम नरेंद्र मोदी यांनी केलं. राज्याचा राजकारणात  माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्र हे भ्रष्टाचार आणि दलालांचा अड्डा बनला होता. गेल्या 5 वर्षात या दलालांना चपराक दिली, कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप गेल्या 5 वर्षात सरकारवर नाही.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला?, पाहा VIDEO

महाजनादेश यात्रा हा ग्रामराज्य ते रामराज्य असा प्रवास आहे. साडेतीन कोटींचे धनादेश या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जनतेनं दिले. यात्रेचं गावागावात महिलांनी अभूतपूर्व स्वागत केलं. उज्वला योजनेचा लाभ महिलांना मिळाला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार, देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रीलियन डॉलर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1ट्रीलियन डॉलर करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

First published: September 19, 2019, 7:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading