'ठाकरे म्हणजे मराठी माणसाची अस्मिता', ED प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची आक्रमक प्रतिक्रिया

'ठाकरे म्हणजे मराठी माणसाची अस्मिता', ED प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची आक्रमक प्रतिक्रिया

ठाणे, 22 ऑगस्ट : 'राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवल्याने लोकांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता फक्त मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाही तर संपूर्ण समाजामध्ये आहे. कारण ठाकरे म्हटलं की मराठी माणसाची अस्मिता हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. सुडाचे राजकारण या देशातील सहन करत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

ठाणे, 22 ऑगस्ट : 'राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवल्याने लोकांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता फक्त मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाही तर संपूर्ण समाजामध्ये आहे. कारण ठाकरे म्हटलं की मराठी माणसाची अस्मिता हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. सूडाचे राजकारण या देशातील जनता सहन करत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (गुरुवारी) ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. साधारणत: सकाळी साडेअकरा वाजल्यापासून राज यांची चौकशी सुरू असून काही तास ही चौकशी सुरू राहील, अशी माहिती आहे.

सुप्रिया सुळेंचीही सरकारवर टीका

'ED ची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या ईडी चौकशीप्रकरणी सरकारवर टीका करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांना दिलेल्या पाठिंब्यावरही भाष्य केलं आहे. 'बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार अजूनही जिवंत आहेत, यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, राज ठाकरेंच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालय, कृष्णकुंज आणि दक्षिण मुंबई परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलं आहे. मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आलं आहे. ही कोणतीही कारवाई नसून खरबरदारी म्हणून उचललेलं पाऊल आहे, असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं आहे.

मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर संतोष धुरी यांना कीर्ती कॉलेज परिसरात पोलिसांकडून नेण्यात आलं आहे.

VIDEO : 'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 03:03 PM IST

ताज्या बातम्या