मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपला साथ देणाऱ्या 18 नगरसेवकांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी,आमदाराला मात्र अभय?

भाजपला साथ देणाऱ्या 18 नगरसेवकांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी,आमदाराला मात्र अभय?

 राष्ट्रवादीनं कारवाई करताना दुजाभाव का केला असा सवालही उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादीनं कारवाई करताना दुजाभाव का केला असा सवालही उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादीनं कारवाई करताना दुजाभाव का केला असा सवालही उपस्थित केला जात आहे.

    सागर कुलकर्णी आणि साहेबराव कोकणे, प्रतिनिधी मुंबई, 12 जानेवारी : नगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची हकालपट्टी करण्याबरोबरच शहर कार्यकारणीही राष्ट्रवादीकडून बरखास्त करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कारवाईचे आदेश दिले आहे. परंतु, राष्ट्रवादीनं नगरसेवकांवर कारवाई केली पण ज्यांच्या आदेशावर नगरसेवकांनी भाजपची नाव तिराला लावली, त्या आमदार संग्राम जगतापांवर मात्र कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीनं कारवाई करताना दुजाभाव का केला असा सवालही उपस्थित केला जात आहे. नगरच्या महापालिका निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भाजपचा उमेदवार राष्ट्रवादीच्या मदतीनं महापौरपदी विराजमान झाला होता. विशेष म्हणजे, पक्षनेतृत्त्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली होती. महापौर निवडीच्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होणार अशी शक्यता होती. परंतु, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून आण्यासाठी रणनीती आखली होती. जगताप यांनी घडवून आणलेल्या युतीमुळे भाजपने महापौरपदाची निवडणूक जिंकली होती. संग्राम जगताप यांच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 'राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्याचे आदेश नव्हते. ज्या नगरसेवकांनी भाजपला मदत केली, त्यांच्यावर कारवाई करू, असं शरद पवार यांनी सांगितलं होतं. तर जयंत पाटील यांनी सर्व नगरसेवकांना नोटीस बजावली होती. अखेर आज या 18 नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु, संग्राम जगताप यांना अभय का देण्यात आला, असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. =======================
    First published:

    Tags: BJP, Jayant patil, NCP, जयंत पाटील, राष्ट्रवादी

    पुढील बातम्या