'राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार', विधानसभेसाठी अजित पवारांनी फुंकलं रणशिंग

'राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार', विधानसभेसाठी अजित पवारांनी फुंकलं रणशिंग

राष्ट्रवादीचा आज 20 वा वर्धापनदिन असून मुंबईत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं म्हणत पक्षाच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचा आज 20 वा वर्धापनदिन असून मुंबईत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 'दुष्काळाबाबत सरकार काहीच लक्ष देत नाही. परदेशातील दौरा पुर्ण झाल्यानंतर आता दुष्काळाची आठवण आली,' असं म्हणत अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या आधी 9 जून रोजी आपल्या Sharad Pawar या फेसबुक पेजवरून लोकांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

सोशल मीडियाचा वापर करून भाजपने आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्या तुलनेत या तंत्राचा प्रभावी वापर करणं विरोधकांना जमलं नाही. याचा त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी काळात असा फटका बसू नये म्हणून शरद पवार यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

VIDEO विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू - मुख्यमंत्री

First published: June 10, 2019, 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading