Home /News /maharashtra /

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

राष्ट्रवादीतील महत्त्वाचा मुस्लिम चेहरा असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक (Abdul Gaffar Malik) यांचं निधन झालं आहे.

    जळगाव, 25 मे: राष्ट्रवादीतील महत्त्वाचा मुस्लिम चेहरा असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक (Abdul Gaffar Malik) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने NCP चा  एक महत्त्वाचा मुस्लिम नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. सोमवारी रात्री त्याचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. यानंतर सोमवारी त्यांचा हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्वीट करत गफ्फार मलिक यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवाजीचे राज्य अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिकजी यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख वाटलं, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे. माझ्या संवेदना त्यांचे कुटुबीय आणि मित्रपरिवारासोबत आहे, असंही ते म्हणाले. तत्कालीन आमदार सुरेश जैन (Suresh Jain) यांचे विश्वासू सहकारी अशी गफ्फार मलिक यांची ओळख होती. परंतू सुरेश जैन यांनी NCP ला रामराम केल्यानंतरही मलिक राष्ट्रवादीतच होते. पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यापूर्वी ते जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवक आणि इतर समितीच्या अध्यक्षस्थानी होते. 2014 मध्ये त्यांना यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Nawab malik, NCP

    पुढील बातम्या