राष्ट्रवादीला धक्का! अजित पवारांसोबत प्रचार करून 12 तासाच्या आत माजी आमदाराचा भाजपप्रवेश

राष्ट्रवादीला धक्का! अजित पवारांसोबत प्रचार करून 12 तासाच्या आत माजी आमदाराचा भाजपप्रवेश

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने पुण्यातील उमेदवाराचा प्रचार केल्यानंतर 12 तासाच्या आतच भाजपमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. पण आता मतदानाला काही दिवस उरले असताना भाजपने राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघातील माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

बापूसाहेब पठारे हे पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. 2009 मध्ये ते राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. सध्या वडगाव शेरी मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आणि उमेदवार जगदीश मुळीक हे आहेत. राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्यानं जगदीश मुळीक यांच्यासमोरील अडथळा दूर झाला आहे. बापूसाहेब पठारे यांच्या भाजपप्रवेशावेळी जगदीश मुळीक हेसुद्धा उपस्थित होते.

बापूसाहेब पठारे सोमवारी अजित पवार यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याला 12 तास होण्यापूर्वीच पठारे यांनी भाजपप्रवेश केला. राष्ट्रवादीकडून पठारे हे वडगाव शेरी मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादीने सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या बापूसाहेब पठारे यांनी भाजपची वाट धरल्याचं म्हटलं जात आहे.

वडगाव शेरी मतदारसंघात सोमवारी राष्ट्रवादीचे उमेदवार टिंगरे यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी उमेदवार सुनील टिंगरे यांच्यासह माजी आमदार बापूसाहेब पठारे हेसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर रात्रीच ते मुंबईत दाखल झाले आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

Published by: Suraj Yadav
First published: October 15, 2019, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading