मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नजीब मुल्लांसह राष्ट्रवादीचे नगरसेवक पुन्हा शिंदेंच्या भेटीला; आव्हाडांचं टेन्शन वाढलं!

नजीब मुल्लांसह राष्ट्रवादीचे नगरसेवक पुन्हा शिंदेंच्या भेटीला; आव्हाडांचं टेन्शन वाढलं!

नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. ते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात.

नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. ते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात.

नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. ते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India

ठाणे, 5 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जे बॅनर लावण्यात आले होते, त्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचा फोटो नव्हता, मात्र दुसरीकडे शिंदे गटातील अनेक बड्या नेत्याचे फोटो या बॅनरवर पहायला मिळाले तेव्हापासूनच नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. नजीब मुल्ला, राजन किनी यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

रिल व्हायरल

राष्ट्रवादीचे काही नगरसेवक हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत अशी चर्चे सुरू असतानाच आता नजीब मुल्ला, राजन किनी यांच्यासह इतर काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. वाढदिवसानिमित्त या नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची एक रिल देखील व्हायरल झाली आहे.  “तेरे मेरे सपने एक रंग” या गाण्यावर ही रील बनवण्यात आली आहे. या रीलमधून नरेश मस्के यांनी राष्ट्रवादीला डिवचले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय 

नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. ते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. तसेच नजीब मुल्ला हे अजित पवार यांचे देखील विश्वासू आहेत. त्यामुळे जर नजीब मुल्ला यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो.

First published:

Tags: Jitendra awhad