शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर शरद पवारांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलं उत्तर

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर शरद पवारांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलं उत्तर

कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जालन्यात दाखल झाले आहेत.

  • Share this:

विजय कमळे पाटील, जालना, 20 सप्टेंबर : पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जालन्यात दाखल झाले आहेत. शरद पवार हे काल रात्रीपासून जालन्यात मुक्कामी असून विधानसभा निवडणुकीचे काऊंट डाऊन सुरू असल्यानं त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आलं आहे.

राज्यात भाजपमध्ये सुरू असलेल्या मेगा भरतीदरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र आज शरद पवार यांच्या उपस्थितीतच राजेश टोपे यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 'मी राष्ट्रवादीतच राहणार आहे,' असा खुलासा त्यांनी केला आहे.

दरम्यान, जालन्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून बेशिस्तीचे प्रदर्शन करण्यात आलं आहे. सभास्थळी मोठी गर्दी झाल्याने कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतच बाचाबाची झाली. अखेर व्यासपीठावरील नेत्यांच्या सूचनेवरून सुरक्षा नियम पायदळी तुडवत कार्यकर्त्यांनी " डी " कक्षामध्ये प्रवेश केला. या सगळ्या प्रकारामुळे शरद पवारांची सुरक्षा वाऱ्यावर आहे काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी पवार मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत.

Loading...

'मी जर घरात असेल तर मला अस्वस्थ व्हायला होतं. पण लोकांना भेटल्यावर मला बरं वाटतं. त्यांच्याकडून मला मोठी उर्जा मिळते,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

'भाई पण नाही छोटाही अन् मोठाही नाही', कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...