'स्वाभिमानी'चा सस्पेन्स संपला; राष्ट्रवादीने सोडली एक जागा

'स्वाभिमानी'चा सस्पेन्स संपला; राष्ट्रवादीने सोडली एक जागा

स्वाभिमानी शेतकरी संघटना कुणाबरोबर जाणार याचा सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत हातगणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी काही जागा सोडण्याची चर्चा आमच्या नेत्यांमध्ये झाली, असं सांगत राष्ट्रवादीने अखेर हातकणंगलेची जागा स्वाभिमानीसाठी सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली यात 12 जणांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली.

असे आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार

रायगड -  सुनील तटकरे

बारामती - सुप्रिया सुळे

सातारा - उदयनराजे भोसले

बुलडाणा - राजेंद्र शिंगणे

जळगाव - गुलाबराव देवकर

परभणी - राजेश विटेकर

ठाणे - आनंद परांजपे

कल्याण - बाळाजी पाटील

हातकणंगले - राजू शेट्टी

सातारा - उदयनराजे भोसले

रायगड - सुनील तटकरे

कोल्हापूर - धनंजय महाडिक

काँग्रेसचे उमेदवार जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून 5 नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर हा भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी मोठी लढत पाहण्यास मिळणार आहे. तसंच मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉ.नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी करण्यात आली आहे.

नागपूर- नाना पाटोले

गडचिरोली- नामदेव मुसंडी

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा

सोलापूर- सुशीलकुमार शिंदे

दरम्यान, काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत एकूण 21 नावे जाहीर करण्यात आली आहेत. यातील महाराष्ट्रातील 5 तर उत्तर प्रदेशमधील 16 जणांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोरादाबादमधून राज बब्बर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय सुल्तानपुरमधून संजय सिंह यांना दिली आहे. या मतदारसंघातून त्यांना भाजपचे उमदेवार वरुण गांधी यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.

VIDEO: 'कॉल मी राहुल...' म्हणताच 'ती' लाजली

First published: March 14, 2019, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading