'ते आले...हरले आणि आता निघून गेले', राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार शिवसेनेत जाणार

राष्ट्रवादीच्या तिकीटावार लोकसभा निवडणूक लढवलेले धनराज महाले हे आज शिवसेनेत घरवापसी करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 11:56 AM IST

'ते आले...हरले आणि आता निघून गेले', राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार शिवसेनेत जाणार

दिंडोरी, 16 ऑगस्ट : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार आहे. कारण दिंडोरीतून राष्ट्रवादीच्या तिकीटावार लोकसभा निवडणूक लढवलेले धनराज महाले हे आज शिवसेनेत घरवापसी करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी साडेअकरा वाजता धनराज महाले मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

धनराज महाले हे मूळ शिवसेनेचेच नेते आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने दिंडोरीतून धनराज महाले यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत भारती पवार यांनी धनराज महालेंचा पराभव केला.

आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनराज महाले यांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला दुहेरी धक्का बसला आहे. कारण आधी लोकसभेत महालेंना तिकीट दिल्याने भारती पवारांनी पक्ष सोडला. त्यानंतर आता धनराज महालेही राष्ट्रवादीतून बाहेर पडत आहेत.

विधानसभा निवडणुकीत दिंडोरीची जागा युतीत शिवसेनेकडे आहे. त्यामुळेच महाले यांनी स्वगृही परतण्याचा घेतला निर्णय घेतल्याची चर्चा आहे. धनराज महालेंच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2019 11:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...