'रक्ताच्या नात्यापेक्षाही...', पंकजा यांच्यानंतर धनंजय मुंडेंनीही रक्षाबंधनाला व्यक्त केल्या भावना

'रक्ताच्या नात्यापेक्षाही...', पंकजा यांच्यानंतर धनंजय मुंडेंनीही रक्षाबंधनाला व्यक्त केल्या भावना

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : 'माझ्या अंगणवाडी सेविका, ऊसतोड मजूर भगिनी, महिला बचत गटांच्या भगिनी प्रत्येकीच्या भावना, त्यांच्या प्रश्नांची जाण मला आहे. त्यासाठी आजही लढतोय उद्याही लढणार. एक भाऊ म्हणून! रक्ताच्या नात्याइतकेच नव्हे तर त्यापेक्षा जास्त घट्ट नाते मिळाले आहेत, या नशीबवान भावाला. खरंच भाग्यवान आहे मी,' असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे हे भाऊ-बहिण आहेत. मात्र राजकीय मतभेदानंतर या नात्यातही काहीसा दुरावा आला आहे. पंकजा मुंडे यांनी सकाळी ट्वीट करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून, राष्ट्रवादीचा पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर फिरत असताना हजारो बहिणींनी आशीर्वाद दिला. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून 1500 भगिनींचे कन्यादान करण्याचे भाग्य मला लाभले त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो,' असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देताना पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

'आज रक्षाबंधन. मी समजते माझे भाऊ मला खूप प्रेम करतात आणि ते मला राखी बांधण्याची इच्छा व्यक्त करतात. पण एकाला राखी बांधून दुसऱ्या भावाला टाळता येणार नाही. मग सर्वांना कसं समजावता येईल?' असं ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

'मी अगदी हृदयावर दगड ठेऊन टाळते. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद पोहचले. तुम्ही माझी रक्षा करणार, याचा विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासाची रक्षा करणं माझे कर्तव्य आहे. राखी नाही बांधली तरी रक्षा हे बंधन आपल्यात सदैव आहेच,' असं म्हणत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 04:04 PM IST

ताज्या बातम्या