मुंबई14 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली यात 5 जणांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली. मात्र पहिल्या यादीत पार्थ पवार याचं नाव नाही. पुढच्या दोन दिवसांमध्ये इतर नावे जाहीर केले जातील असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
असे आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार
रायगड - सुनील तटकरे
बारामती - सुप्रीया सुळे
सातारा - उदयनराजे भोसले
कोल्हापूर - धनंजय महाडीक
बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
परभणी - राजेश विटेकर
जळगाव - गुलाबराव देवकर
ठाणे - आनंद परांजपे
मुंबई उत्तर पूर्व - संजय दीना पाटील
काँग्रेसचे उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून 5 नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर हा भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी मोठी लढत पाहण्यास मिळणार आहे. तसंच मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉ.नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी करण्यात आली आहे.
नागपूर- नाना पाटोले
गडचिरोली- नामदेव मुसंडी
मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त
दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा
सोलापूर- सुशिलकुमार शिंदे
दरम्यान, काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत एकूण 21 नावे जाहीर करण्यात आली आहेत. यातील महाराष्ट्रातील 5 तर उत्तर प्रदेशमधील 16 जणांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोरादाबादमधून राज बब्बर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय सुल्तानपुरमधून संजय सिंह यांना दिली आहे. या मतदारसंघातून त्यांना भाजपचे उमदेवार वरुण गांधी यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.