राष्ट्रवादीची यादी जाहीर मात्र मावळ आणि माढ्याचा सस्पेन्स कायम

राष्ट्रवादीची यादी जाहीर मात्र मावळ आणि माढ्याचा सस्पेन्स कायम

राष्ट्रवादी माढा आणि मावळमधून कुणाला उमेदवारी देते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.

  • Share this:

मुंबई 14 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली यात 12 जणांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली. मात्र सर्वाधिक चर्चेत असलेल्या मावळ आणि माढा या दोन मतदारसंघातली नावे मात्र पहिल्या यादीत जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे.

इतर नावांबाबात चर्चा सुरू असून योग्य वेळी नावं जाहीर करू असं पाटील यांनी स्पष्ट केलं. सर्व नावे एकाच वेळी जाहीर करावं असं नाही असंही ते म्हणाले. मावळ मधून अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार आणि मावळमधून विजयसिंह मोहिते पाटील किंवा प्रभाकर देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली यात 5 जणांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली. मात्र पहिल्या यादीत पार्थ पवार याचं नाव नाही. पुढच्या दोन दिवसांमध्ये इतर नावे जाहीर केले जातील असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

असे आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार

रायगड - सुनील तटकरे

बारामती - सुप्रीया सुळे

सातारा- उदयनराजे भोसले

कोल्हापूर - धनंजय महाडीक

बुलढाणा - राजेंद्र शिंगणे

परभणी - राजेश विटेकर

जळगाव - गुलाबराव देवकर

ठाणे - आनंद परांजपे

मुंबई उत्तर पूर्व - संजय दीना पाटील

काँग्रेसचे उमेदवार जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून 5 नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर हा भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी मोठी लढत पाहण्यास मिळणार आहे. तसंच मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉ.नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी करण्यात आली आहे.

नागपूर- नाना पाटोले

गडचिरोली- नामदेव मुसंडी

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा

सोलापूर- सुशिलकुमार शिंदे

VIDEO: 'कॉल मी राहुल...' म्हणताच 'ती' लाजली

First published: March 14, 2019, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading