कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचं निधन, शरद पवारांनी घरी जाऊन केलं सांत्वन

कुटुंबियांनी साने यांच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरल्याचं पाहायला मिळालं.

कुटुंबियांनी साने यांच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:
पिंपरी चिंचवड, 7 जुलै : पिंपरी चिंचवडमधी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनाची लागण झाल्याने नुकतंच निधन झालं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साने कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आहे. यावेळी कुटुंबियांनी साने यांच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरल्याचं पाहायला मिळालं. दिवंगत दत्ता साने यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार केले गेले नसल्याचा आरोप करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी यावेळी कुटुंबीयांनी शरद पवार यांच्याकडे गेली. दत्ता सावंत यांचं निधन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. हेही वाचा - बापरे! हवेतुनही पसरू शकतो कोरोना व्हायरस, 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी दिला हा इशारा दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर सुरू होते. 4 जुलैला पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
Published by:Akshay Shitole
First published: