Home /News /maharashtra /

गोपीचंद पडळकरांना दुचाकीवरून फिरवणं पडलं महागात, नगरसेवकाची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

गोपीचंद पडळकरांना दुचाकीवरून फिरवणं पडलं महागात, नगरसेवकाची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

जतचे राष्ट्रवादी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत दुचाकीवरून फेरफटका मारला होता.

सांगली, 27 जून: जतचे राष्ट्रवादी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत दुचाकीवरून फेरफटका मारला होता. या प्रकरणी पक्षानं आता गंभीर दखल घेतली आहे. नगरसेवक लक्ष्मण एडके यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एडके यांची राष्ट्रवादी पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.ळालं होतं. हेही वाचा..शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, सत्तास्थापनेच्या दाव्यावर फडणवीसांनाही टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानं गेल्या दोन दिवसांपासून राजकारण तापलं आहे. पडळकर यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरांवरून निषेध करण्यात आला. मात्र, एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला जात असतानाच सांगलीतील जतमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं होतं. शरद पवारांवर टीका केल्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे पुतळे जाळत आंदोलन करण्यात आलं. तसेच पडळकर यांना राज्यभरात फिरकू देणार नाही, अशी भूमिका घेतली असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण एडके आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. राष्ट्रवादी आणि पडळकर संघर्ष शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून टीका केली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे पुतळे जाळत आंदोलन केलं. तसंच पडळकर यांना राज्यभरात फिरकू देणार नाही, अशी भूमिका घेतली. पडळकरांच्या टीकेवर काय म्हणाले शरद पवार? गोपीचंद पडळकर यांच्या विखारी टीकेला शरद पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पुण्यात खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. हेही वाचा...कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा बैठक संपल्यानंतर माध्यमांकडून शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांच्या टीकेविषयी विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी पडळकरांना थेट उत्तर देण्याचं टाळलं. 'मला बोलायचं आहे...पण आता नाही...लवकरच सविस्तर बोलेन,' असं म्हणत शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर लगेचच प्रतिहल्ला करण्याचं टाळलं.
First published:

Tags: NCP chief sharad pawar, Sharad pawar

पुढील बातम्या